

Swiss Visit: Sweet Talks of Chocolate and Strawberries
sakal
प्रिय मित्रवर्य कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांसी, शतप्रतिशत प्रणाम.
दावोसचा दौरा गाजवून मी परत आलो, त्यालाही आता दोनतीन दिवस उलटले. वीस-तीस लाख कोटींचे सामंजस्य करार करुन स्वित्झर्लंडहून परत आलो. आता पाचेक वर्ष बघायला नको! पैसाच पैसा!! आता महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होणार, यात शंका नाही. स्वित्झर्लंडहून परतल्यावर मुंबईतल्या करारांवर बसू आणि बोलू, असे मी म्हटले होते, पण तुमचा पत्ताच नाही. मुंबईचा महापौर नेमण्यासाठी आपले भेटायचे ठरले होते. म्हंजे स्वित्झर्लंडहून परत आल्यावर काय ते ठरवू, असे माझे मीच ठरवले होते.