Dhing Tangsakal
satirical-news
ढिंग टांग : आपटबार, फटाके आणि गौप्यस्फोट…!
दिवाळीच्या काळात फटाक्यांबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. कानठळ्या बसणारे, प्रदूषण करणारे फटाके वाजवू नयेत, असे बजावण्यात आले आहे.
ढिंग टांग
प्रिय दादासाहेब बारामतीकर,
सप्रेम जय महाराष्ट्र. सध्या आचार संहिता असली तरी गृह विभागाची नित्याची कामे चालू आहेत, आणि त्यानुसार दिवाळीच्या काळात फटाक्यांबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. कानठळ्या बसणारे, प्रदूषण करणारे फटाके वाजवू नयेत, असे बजावण्यात आले आहे. तरीही तुम्ही परवा तासगाव-कवठेमहांकाळ भागात भर सभेत जबरदस्त गौप्यस्फोट केलात!! हा आचार संहितेचा नसला तरी फटाके प्रतिबंधक नियमावलीचा निश्चितच भंग आहे.
