dhing tang
sakal
फ्रॉम द डेस्क ऑफ-
द ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका,
व्हाइट हाऊस, १६००, पेनसिल्वेनिया अवेन्यू,
एनडब्ल्यू, वॉशिंग्टन डीसी. २०५००.
नॉर्वेजियन नोबेल पीस प्राइज समिती किंवा जो कोणी (वाट्टेल तो) संबधित असेल तो- माझे नाव डोनाल्ड ट्रम्प असून मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे. मला ताबडतोब नोबेल पीस प्राइज हवे असून ते एकतर कुरियरने पाठवावे, किंवा कुठे मिळेल ते सांगितल्यास माल उचलण्याची व्यवस्था केली जाईल. तुमची समिती नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवते, असे मला खात्रीलायकरीत्या कळले आहे.