
ढिंग टांग
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे येत्या काही वर्षात (किंवा दशकांत) वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत असल्यामुळे त्यांनीच घालून दिलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागणार, हे तर उघड आहे. खरे तर मोदीजींच्या निवृत्तीची चर्चाच होऊ शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे. त्यांना कोण रिटायर करायला बसलंय? ते असे मधूनच रिटायर झाले तर २०४७ सालापर्यंत भारत देश विकसित कसा होणार? तो विश्वगुरु कसा होणार? तो महासत्ता कसा होणार? असे अनंत प्रश्न निर्माण होतील. ते टाळायला हवे. शक्यतो त्यांना निवृत्त होण्याच्या विचारापासून परावृत्त करावे. त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांच्याकडे धाडावे.