स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : टळलेली!राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. नुसतेच अस्वस्थ नसून संतापलेलेही आहेत. नुसतेच संतापलेले नसून तापलेलेही आहेत. मूठ आवळून रागारागाने ते दरवाजाकडे पाहात आहेत. अब आगे….उधोजीराजे : (कडाडत) कोण आहे रे तिकडे…!संजयाजी फर्जंद : (त्वरेने आत येत) मुजरा महाराज! तिकडेही मीच आहे, आणि इकडेही मीच आहे!!उधोजीराजे : (हतबुद्ध होत) इकडे तिकडे चोहीकडे, तुम्हीच कसे गडे?संजयाजी फर्जंद : (अभिमानाने) मी तुमचाच एकनिष्ठ आणि कसबी सेवक आहे, महाराज!!.उधोजीराजे : (गंभीरपणाने) असू दे असू दे! खुशामद करो नका!! आम्हांस खुशामदखोरांची सख्त नफरत आहे!! सगळ्या खुशामदखोरांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला, हे कदापिही विसरो नका!!संजयाजी फर्जंद : (नम्रपणाने) अलबत महाराज! सर्व खुशामदखोर त्या खोकेवाल्यांकडे रवाना झाले आहेत! बरं झालं, पीडा गेली..!!उधोजीराजे : (जमेल तितका क्रुद्ध चेहरा करुन) तुमच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत, फर्जंद?संजयाजी फर्जंद : (मान खाली घालून) या गरीब फर्जंदाबद्दल कुणाची काहीही तक्रार असो! खाविंदांची…आपलं सॉरी…महाराजांची तर खप्पामर्जी नाही ना?.उधोजीराजे : (विचारमग्न होत) ते ठरेल!! तुम्ही आपला पक्ष बुडवणार असा गंभीर आरोप केला जातोय! तुमचं काय म्हणणं आहे?संजयाजी फर्जंद : (अजीजीनं) एक नाचीज सेवक एवढा मोठा पक्ष कसा बुडवणार, महाराज?उधोजीराजे : (येरझारा घालत) कमळ पक्षाचे एक शिलेदार गिरीशाजी महाजन यांनी सांगावा धाडलाय की, तुम्ही तुमच्या निव्वळ बडबडीने पक्ष आणि आम्हाला खड्ड्यात घालायला निघाला आहात! या आरोपाबाबत तुमचं काय म्हणणं आहे?संजयाजी फर्जंद : (तारस्वरात) अरेऽऽ…लाऽऽज वाटली पाहिजेऽऽ…! यांना नाड्या तरी बांधता येत होत्या का? आरोप करताहेत लेकाचे! नतद्रष्ट, पातळयंत्री, विश्वासघातकी, खंजीर खुपशे मेले!! नाही यांना वीस फूट खोल गाडला तर नावाचा-.उधोजीराजे : (दचकून) हो हो हो हो! किती हा भयंकर संताप!! केवढी ती बारा हात लांब जीभ! लगाम द्या, फर्जंद जिभेला लगाम द्या!संजयाजी फर्जंद : (जीभ चावत) यांच्या दहा पिढ्या आल्या तरी आपला पक्ष संपणार नाही, महाराज!! आपला पक्ष संपवण्याची भाषा करणाऱे महाराष्ट्रद्रोही आहेत, महाराज! यांना सुळावर चढवा!उधोजीराजे : (न्यायबुद्धीने) ते आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही! त्यांचं आम्ही बघून घेऊ! तुम्ही तुमच्यावरच्या आरोपाबद्दल बोला! तेवढं सोडून तुम्ही सगळं बोलताय!!संजयाजी फर्जंद : (खांदे पाडून) मी एक साधासिंपल सेवक आहे महाराज! यह सरासर मेरे खिलाफ साजिश रची जा रही है!!.उधोजीराजे : (अस्वस्थपणे) तुमच्या बडबडीमुळे पक्ष रसातळाला चाललाय…असं लोक म्हणतायत!!संजयाजी फर्जंद : (कान पकडत) छे, छे, महाराज!! भलतंच! माझ्यामुळे उलट पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे, असा आरोप आहे!! मी आहे, म्हणून पक्षात लढवय्या वृत्ती टिकून राहिली आहे! बाकीचे सगळे शेपूट दाबून पळाले, पण तुमचा हा ढाण्या वाघ अजूनही डरकाळ्या मारतो आहे! या खातर मला खरं तर सोन्याचं कडं बहाल करण्यात यावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे, महाराज!!.उधोजीराजे : (गोंधळात पडून) बरं बरं, देऊ तुम्हाला कडं!संजयाजी फर्जंद : (मुजरा करत) थँक्यू, महाराज!उधोजीराजे : (विनंतीवजा सुरात) पण थोडं कमी बोललात तर नाही का चालणार?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.