Political Reconciliation
Sakal
satirical-news
ढिंग टांग : मनोमीलन : अंक दुसरा…!
प्रिय सदूस, सप्रेम जय महाराष्ट्र. श्रीगणरायाच्या दर्शनाला मी तुझ्या घरी येऊन गेलो. दोन मोदक (साजूक तूप एक चमचा), खास माझ्यासाठी केलेले अळूचे फतफते वगैरेचा आस्वाद घेतला. पण मनासारख्या गप्पा झाल्या नाहीत. तुझ्याकडे फार माणसे येतात. हे बरे नाही. विनाकारण खर्च वाढवू नये. लहानपणापासूनच तू उधळ्या स्वभावाचा आहेस. पण ते जाऊ दे.

