

A Comic Exchange of Political Confusion
Sakal
स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : आराम!
चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हाय देअर बॅब्स…! मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (वैतागून) आधीच खोलीत शिरुन मग ‘येऊ का?’ असं विचारण्यात काय अर्थ आहे? ही आराम करण्याची वेळ आहे, प्लीज डू नॉट डिस्टर्ब!!
विक्रमादित्य : (करमचंद जासूसच्या आविर्भावात) माझ्याकडे जबरदस्त खबर आहे!
उधोजीसाहेब : (सपशेल दुर्लक्ष करत) होक्का? छान छान! झोपा आता!!
विक्रमादित्य : (तळहातावर मूठ हापटत) बाहेर आली ना, तर हैड्रोजन बॉम्बपेक्षा मोठा स्फोट होईल!! नागपूरची हवा गरमागरम होईल! ऐन थंडीत सावजी कोंबडी खाल्ल्यावर येतो तसा घाम फुटेल!!