
ढिंग टांग
सदू : (सावधगिरीने फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!
दादू : (तितक्याच सावधगिरीने फोन उचलत) हा माझाच रिंगटोन आहे की कुणी माझी चेष्टा करतंय?
सदू : (झटकन आवाज ओळखत) दादूराया, अरे…मीच बोलतोय! तुझा शिवाजी पार्कचा बिछडलेला भाऊ!!
दादू : (चेष्टेने) हां हां! तो लहानपणी जत्रेत हरवलेला?
सदू : (मूळ मुद्द्यावर येत) फोन कधी करणार आहेस?
दादू : (गोंधळून) कोणाला?