ढिंग टांग : पुणे-मुंबई: एक थरारयात्रा..!

…प्रसंग आठवून त्याच्या अंगावर शहारे आले. दुश्मनावरही असा प्रसंग यायला नको! ते ३२ तास भयंकर होते. पण तो परिस्थितीशी शर्थीने झुंजला. निकराने लढला.
A Tale of Struggles and Triumph

A Tale of Struggles and Triumph

sakal

Updated on

तो रिक्षातून उतरला. रिक्षावाल्याकडे सुटे नव्हते. त्याच्याकडे बंदे नव्हते. तरीही रिक्षावाल्याने कटकट केली नाही. एक कडक सलाम मारुन, (रिक्षाचा) दांडा ओढून तो फर्रर्रकन निघून गेला. तो स्वत:शीच हसला.

अंग झेजरुन निघाले होते. देहाच्या रंध्रारंध्रात थकवा होता. ‘सरणार कधी रण, प्रभु तरी, हे कुठवर साहू घाव शिरी’ अशा हताहत अवस्थेत तो अखेर घरापाशी पोचला. दुरुनच त्याला आपले चाळीतले घर दिसले. त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ‘बॉर्डर’ चित्रपटातले गाणे नकळत त्याच्या ओठांवर आले. के घर कब आओगे, लिखो कब आओगे, के तुम बिन ये घर सूना है…

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com