ढिंग टांग : यह राखी बंधन है ऐसा..!

तळे राखी तो पाणी चाखी, अशी म्हणच आहे. ही म्हण आम्ही उगीचच सांगितली. तिचा राखीपौर्णिमेशी काहीही संबंध नाही.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on: 

तळे राखी तो पाणी चाखी, अशी म्हणच आहे. ही म्हण आम्ही उगीचच सांगितली. तिचा राखीपौर्णिमेशी काहीही संबंध नाही. तुम्हाला वाटेल की जो मनुष्य राखी भज्यांसारखी तळून काढेल, त्याला पाणी लपलप पिता येईल. भले! असे कुठे नसते. राखी पौर्णिमा हा श्रावणातला आपला लाडका सणवार आहे.

राखी पौर्णिमेचे आपल्या संस्कृतीत भारी महत्त्व आहे. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधायची असते. भावाने बहिणीचे रक्षण करायचे असते, या उदात्त भावनेचे प्रतीक म्हणजे राखी. विश्वासाचे प्रतीक म्हणजे राखी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com