

sakal
आजचा दिवस : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ मार्गशीर्ष शु. पंचमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : बिगडी बना दे, मेरे सावजीवाले सैंया, अपना बना ले ओ मेरे नागपुरवाले भईया!
……………………..
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) लोकांचे अलोट प्रेम पाहिले की मला अगदी भरून येते. मी प्रेमाचा भुकेला आहे. काल एका कार्यक्रमात आमचे ठाण्याचे मित्र कर्मवीर भाईसाहेबांनी माझं वर्णन ‘सावजीवाणी तिखट आणि संत्र्यावाणी गोड’ असे केले. मी बसल्याजागी गहिवरलो. किती हे प्रेम!