

Leaders Roar at Shivaji Park
sakal
ढिंग टांग
‘‘ड रपोक, एकजात सगळे डरपोक आहेत!,’’ ‘शिवतीर्था’वरुन सकाळी सकाळी घुमलेली जबर्दस्त गर्जना शिवाजी पार्कच्या भवतालातली कबुतरे भर्रर्रदिशी उडवून गेली. मॉर्निंग वॉकला निघालेले अनेक पाय जागच्या जागी खिळले. सिग्नल तोडून जऽऽरा पुढे सटकावे, तेवढ्यात दबा धरुन बसलेला ट्रॅफिक पोलिस शिट्टी वाजवत सामोरा आल्यावर जसा चेहरा होतो, तसे साऱ्यांचे झाले. सारांश इतकाच, की सकाळी सकाळीच साहेबांचा मूड साफ बिघडून गेला होता.
महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याचा उग्र संकल्प बेडरपणाने हाती घेणारे निर्भय पथिक आदरणीय साहेबांच्या समोर आम्ही अधोवदनाने उभे होतो. पाठीमागील बाजूस गाळण उडाली होती. पण तरीही उसने अवसान आणून कसेबसे उभे होतो…