dhing tang
sakal
रागा : (उत्सुकतेनं फोन फिरवत) हाय देअर…ॲम आय टॉकिंग टु अ ग्रेट सायंटिस्ट मि. विक्रमादित्य?
विक्रमादित्य : (गोंधळून जात) नोप…आय ॲम नुसताच विक्रमादित्य! नॉट अ सायंटिस्ट?
रागा : (चौकशा करत) तुम्हीच बांदऱ्याच्या प्रयोगशाळेत काम करता ना?
विक्रमादित्य : (दुप्पट गोंधळून) कोण मी? छे, मी राहातो तिथं…हे बघा, तुम्ही मार्केटिंग कॉल करत असाल तर फोन ठेवा! मला कुठल्याही घर खरेदीत रस नाही! मला कुठल्याही टूरिस्ट क्लबची मेंबरशिप नको आहे! मला कुठलंही लोन नको आहे! बाय!!