Secret Meeting Highlights Internal Friction in Triple-Engine Alliance
sakal
satirical-news
ढिंग टांग - आम्ही जीवाचे मैतर..!
ट्रिपल इंजिनच्या गुप्त बैठकीत पक्षप्रवेशांवरून निर्माण झालेला कल्लोळ या व्यंगात्मक संवादात विनोदी पद्धतीने मांडला आहे. नेत्यांमधील अविश्वास, मानसिक ताण आणि राजकीय नाट्यमयता यामुळे हा संवाद अधिकच रंगत दाखवतो.
स्थळ : अज्ञात. वेळ : वेषांतराची. पात्रे : ट्रिपल इंजिन!
दादासाहेब : (दबक्या पावलांनी खोलीत शिरत) येऊ का जाऊ? कोणी आहे का?
भाईसाहेब : (खोलीतल्या अंधारातून) मी आधीच येऊन बसलोय!
दादासाहेब : (अंधारात धडपडत खुर्ची शोधत) कशाला लावली अर्जंट मीटिंग?
भाईसाहेब : मी असले प्रश्न विचारत नाही, म्हणून टिकलोय!
दादासाहेब : (आणखी एका क्षणभराच्या शांततेनंतर) मी विचारतो, म्हणून टिकलोय!
नानासाहेब : (घाईघाईनं एण्ट्री घेत) सॉरी, सॉरी! मला उशीर झाला का जरा? पक्षाच्या कामात थोडा अडकलो होतो…एक दोन-तीन पक्ष प्रवेश होते!
दादासाहेब : (सावधगिरीने) यावेळी कुठून आला लाँड्रीत माल?

