

National Economy: India Faces Potential Fiscal Crisis Amid Global Conflicts
Sakal
सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख
अमेरिका-इराण-इस्राईलच्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडून पेट्रोलियम पदार्थांच्या ऊर्जेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे जगातील इतर देशांप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था कचाट्यात सापडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडाभरात हैदराबाद, गुजरात आणि नेदरलँडमध्ये जाऊन अर्थव्यवस्थेवर येत असलेल्या संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी सात आर्थिक पथ्ये पाळण्याचा सल्ला दिल्यामुळे नेमकी कोणती आपत्ती ओढवणार यावरून देशात घबराटीचे आणि संशयाचे वातावरण आहे. पण भारतीयांची आर्थिक सहनशीलता आणि त्यांनी वर्षानुवर्षे सोने-चांदीच्या माध्यमातून केलेल्या बचतीच्या जोरावर हे संकट सहज परतावून लावले जाऊ शकते.