तुघलक! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

इब्न बतूता, बगल में जूता
पेहने तो करता है चुर्रर्र...
किस्सा बताता, मन की बाता
चिडिया उडाता है भुर्रर्र...

""तर हुआ ये के...''
(बगल में जूता पकडे)
इब्न बतूता सांगू लागला...

इब्न बतूता, बगल में जूता
पेहने तो करता है चुर्रर्र...
किस्सा बताता, मन की बाता
चिडिया उडाता है भुर्रर्र...

""तर हुआ ये के...''
(बगल में जूता पकडे)
इब्न बतूता सांगू लागला...

सूरमा-इ- हिंदोस्तां शहंशाह-उल-मुल्क
ैदौलत जुआना खान ऊर्फ
उल्लुघ खॉ ऊर्फ मोहम्मद बिन तुघलक
ह्यांनी एकदा फर्माविले की
तमाम दिल्लीवासीयांनी
दख्खनमधील दौलताबादेकडे
जल्द अज जल्द प्रस्थान ठेवावे.
आजच्या तवारीखपासून
दौलताबाद हीच मुल्काची
राजधानी असेल,
दिल्लीतील हवेल्या, मकान औ'
झुग्गियां जमींदोस्त करण्यात येतील,
एक भी बिल्ली या कुत्ता इथल्या
सुन्या गलीयाऱ्यांमध्ये जिंदा
घुमला नाही पाहिजे...''

मग क्‍या हुआ?
दिल्ली-दौलताबाद आठ पदरी
हायवे तयार झाला...
दर दोन मैलांवर मनपसंद
स्वच्छतागृहे बांधली गेली...
रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच
छांव बांटनेवाले पेडपौधे लागले...
सराया बांधल्या गेल्या...

पूरी दिल्ली निकल पडी...

लेकिन तरीही,
चालीस दिनांच्या प्रवासात
लाखो बच्चे-औरतां-बूढे
मरून पडले, आणि
दौलताबादचा किला बनून राहिला
एक सुनसान कब्रिस्तान...
महम्मद बिन तुघलक पुन्हा
म्हणाला इब्न बतूताला की
""इब्ने, दिल खट्‌टा हो गया,
लोगों को दौलताबाद
रास नहीं आया, सबब
वापस दिल्ली चलते है...''

पुन्हा पूरा दौलताबाद निकल पडा!

""आगे हुआ ये के...''
इब्न बतूता सांगू लागला...

"" तुघलक ने फर्माया के...
कंबख्त निमकहराम सरदार-उमराव
खातात आमचा पैसा,
वो फर्माते है आराम, औ
जमूरियत की नींद हराम?
वो देखे नाची का इल्लम
गरीबों को सिर्फ बॉलिवुड फिल्लम?
उनका जलसा, इनका झुलसा?
ना इब्ने ना, उन्हे कर दो गरीब,
और गरीबों को कर दो अमीर!''

सोने का दिनार औ'
चांदी के अदल
आम इन्सां को नसीब
नहीं होगा कल,
...सबब, करदो इनकी अदलबदल!''

एका रात्रीत दिनार-ओ-अदल
झाले रद्‌दबातल,
तांबा-पितळेचे सस्ते सिक्‍के
रुजू झाले पक्‍के...

आगे क्‍या हुआ, इब्ने?

इब्न बतूताने एक बडासा
सोडला उसासा...म्हणाला :

""क्‍या होना था?
दिल्ली की सूनी गलियारों में
बिल्ली-कुत्ते आज भी नहीं दौडते बर्खुर्दार!''

Web Title: Tughalak - Dhing Tang