कोरोनातून बरे झालात? बुरशीजन्य संसर्गावर आता लक्ष ठेवा

कोरोनाचा व्हायरल लोड, स्टिरॉइड्स औषधांचा वापर यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली असते.
Coronavirus
CoronavirusSakal

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ नावाचा बुरशीजन्य संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. म्युकरमायकोसिस या प्रजातीची बुरशी आपल्या आजूबाजूला हवेमध्ये, मातीमध्ये, जनावरांचे शेण, कंपोस्ट अशा पर्यावरणातील अनेक बाबींमध्ये आढळून येते. म्युकरमायकोसिस शरीरात श्वासातून प्रवेश करते. एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर हा जंतुसंसर्ग रक्तवाहिन्या आणि उतींवरती गुणाकार करण्यास प्रारंभ करतो. या जंतुसंसर्गाचा वेग कर्करोगाच्या गुणाकारापेक्षाही खूप जास्त आहे. हा दुर्मीळ बुरशीजन्य रोग आपल्या पर्यावरणामध्ये अनेक वर्षांपासून असला तरीही आजपर्यंत त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम इतका गंभीर नव्हता. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे परिणाम धोकादायक आहेत, असे आढळून आले आहे.

कोरोनाचा व्हायरल लोड, स्टिरॉइड्स औषधांचा वापर यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली असते. म्युकरमायकोसिसचा संसर्ग कोरोनमुक्त रुग्णांमध्ये वेग पकडताना आढळून येत आहे. या संसर्गाचा धोका ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे, लोह ओव्हरलोड सिंड्रोम, डब्ल्यूबीसी संख्या कमी आहे, किंवा जे एचआयव्ही, कर्करोगबाधित आहेत, अशा रुग्णांना सर्वाधिक आहे.

म्युकरमायकोसिसचे लवकर निदान झाल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधल्यास, या संसर्गाचे निदान केले जाऊ शकते. कोरोनामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. तज्ज्ञ दंतचिकित्सक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी तयार केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून म्युकरमायकोसिसची लक्षणे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शोधली जाऊ शकतात. या रोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णाला जीवघेण्या परिणामांपासून वाचवता येते. आपण कोरोनामुक्त रुग्ण असल्यास, आपल्याला खालील लक्षणांवर नजर ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे:

  • अचानक हलणारा आणि सैल दात

  • टाळूवर काळ्या रंगाची निर्मिती

  • तोंडात अल्सरनिर्मिती

  • दात किंवा हिरड्यांमधून पस येणे

  • नाकातून काळा रक्तस्राव

  • नाक बंद होणे

  • सायनसजवळ वेदना

लवकर निदान होणे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. उपचारांत इंट्राव्हेनस (IV) अँटीफंगल औषधे किंवा सर्जिकल डीब्राइडमेंट (संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित उती कापून टाकणे) यांचा समावेश आहे.

‘डेंटलदोस्त’

‘डेंटलदोस्त’ ही २५ दंतचिकित्सकांची भारतातील पहिली टीम आहे, जी विनामूल्य दंतरोगांचे निदान करण्यासाठी २४ तास, सातही दिवस उपलब्ध असते. म्युकरमायकोसिस रोगाच्या लक्षणांचे निदान अगदी विनामूल्य आणि घरी बसून केले जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही शंकांचे निरसन ७७९७५५५७७७ या क्रमांकावर संपर्क साधून किंवा डेंटलदोस्त या ‘अँड्रॉइड अँप’वर दात स्कॅन करून अगदी विनामूल्य करू शकता.

आपण कोरोनामधून बरे झाला असाल तर म्युकरमायकोसिसपासून वाचण्यासाठी आपण घरी काय करू शकता?

  • कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांनी बाहेर जाताना एन ९५ मास्क घालणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा म्युकरमायकोसिसचे बुरशीजन्य बीजाणू हवेतून आणि ओलसर वातारणातून पसरतात.

  • बाहेर जाताना लांब बाहीचे कपडे आणि ग्लोव्हज घाला. म्युकरमायकोसिसचे फंगल बीजाणू त्वचेवरील कट किंवा बर्न्सद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात.

  • जर वर नमूद केलेली लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

(लेखिका ‘ट्रीसमस हेल्थकेअर टेक्नॉलॉजिस प्रा.लि.’च्या संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com