

"हिटलर मेला नाही, तो तुमच्यातच आहे!" गॅसच्या रांगेत भेटलेल्या आडोल्फचा खळबळजनक खुलासा; वाचा युद्धाच्या 'जैवइंधना'चे गुपित.
Sakal
तुम्हाला सांगायला हरकत नाही,
तुमचा तो हिटलर परवा भेटला,
सिलिंडरच्या रांगेत उभा होतो, तेव्हा...
मी म्हटले, ‘‘हाय आडोल्फ, तू
सध्या असतोस तरी कुठं?’’
गोल गिरकी घेत मज्जेत म्हणाला,
‘‘हा काय इथेच...तुमच्यातच!’’
बोलला बरंच काही,
शास्त्रशुद्ध बंकरविवाहापासून ते
इराणच्या खामेनेइपर्यंत,
इव्हा ब्राऊच्या कुरळ कुंतलांपासून
ते थेट खराती व्हिडिओ क्लिपांपर्यंत.
पँझर तुकड्यांच्या आक्रमणाच्या
व्यूहापासून ते इराणी टेकड्यांच्या पोटातल्या
अण्वस्त्रांच्या तथाकथित साठ्यांपर्यंत.
हविट्झरपासून होर्मुझपर्यंत बऱ्याच
विषयांवर बोलला हिटलर.
‘‘तुला मरून आता ऐंशी वर्षं झाली,
पण बदलला नाहीस अजिबात!’’
मी सहजच म्हटले त्याला, तर
ताडकन म्हणाला गर्रकन वळून,
‘‘हिटलर असा बदलत नसतो बे!