भाष्य : पाश्चात्त्यांच्या चष्म्यातून निसटणारे भारतीय वास्तव

मानवाधिकार, लोकशाही व सुशासनाचा भारतीय दृष्टिकोन पाश्चात्त्य चौकटीत बसत नसल्याने वास्तवाचे विकृत चित्र; इंग्रजी माध्यमांच्या मर्यादित नजरेतून भारताचे आकलन अपुरे
Post-Colonial Perspective: Why Western Concepts of Human Rights Fail to Understand India

Post-Colonial Perspective: Why Western Concepts of Human Rights Fail to Understand India

Sakal

Updated on

डॉ. श्रीकांत परांजपे, सामरिकशास्त्राचे प्राध्यापक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांचे प्रश्न स्वीकारण्यास किंवा पत्रकार परिषद घेण्यास नकार देतात, असे निरीक्षण नोंदविल्याने हॅले ल्युंग ही नॉर्वेजियन पत्रकार चर्चेत आली. तिच्या समाजमाध्यमांवरील ‘पोस्ट’ना मिळालेल्या प्रतिसादामुळे पाश्चात्त्य माध्यमे, बुद्धिजीवी आणि भारताविषयी त्यांच्या दृष्टिकोनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पंतप्रधान कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडत असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांच्याकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी होती. नंतर भारताच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ल्युंगने भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीचा मुद्दा उपस्थित केला. समाजमाध्यमांवर याविषयी बरीच चर्चा झडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com