Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव

Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
Summary

योगाला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. तो भारताचा सौम्य शक्तिस्रोत बनला आहे. भारताने केलेल्या आवाहनानुसार जगात संयुक्त राष्ट्रांतर्फे २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. त्यानिमित्त योगसाधनेची उपयुक्तता आणि महत्त्व विशद करणारा लेख.

संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारतीय नेतृत्वातील ठराव स्वीकारला. हा क्षण दोन कारणांसाठी ऐतिहासिक होता. पहिले कारण म्हणजे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडल्यावर, संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी ९० दिवसांपेक्षा कमी कालावधीत याची अंमलबजावणी केली आणि दुसरे म्हणजे, १७७ राष्ट्रे सह-प्रायोजक म्हणून सामील झाली. जी कोणत्याही आमसभेच्या ठरावासाठी आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या होती. कोविडमुळे जगभरातील सर्वसामान्यांची जीविका आणि उपजीविका विस्कळीत झाली आहे, तेव्हा योगाची प्रस्तुतता अनेक पटींनी वाढली आहे.

योगाभ्यास आणि संकल्पनांची उत्पत्ती आपल्या प्राचीन संस्कृतीत झाली आहे. आमच्या महान संत आणि ऋषींनी शक्तिशाली योगशास्त्र जगातील विविध भागांत नेले आणि ते प्रत्येक सामान्य माणसाच्या आवाक्यात आणले. मन, आत्मा आणि शरीर सुव्यवस्थित करण्याची किमया ही पद्धती घडविते. दैनंदिन जीवनात तणाव आणि प्रचंड दबावाचा सामना करणाऱ्या आणि त्याचबरोबरीने शरीराची लवचिकता सुधारण्यासाठी आणि इतर आजारांना कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यासाठी योग हे एक आवश्यक साधन आहे.

Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
कोरोनामुक्त झाल्यानंतरचा 'योग'मंत्र

योगसाधनेचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती ः कोविड -१९ ने मानवतेवर सर्वात मोठे संकट आणले आहे. या महासाथीमुळे मानवी जीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि सार्वजनिक आरोग्यापुढे अभूतपूर्व आव्हान उभे राहिले. सध्या आपण सर्वजण आपल्या घरात अडकलेले व बंधनात आहोत. सतत संसर्गाच्या भीतीच्या छायेत जगत आहोत. इतक्या दीर्घ काळासाठी बंधनामध्ये राहिल्यामुळे आपल्या इतर शारीरिक आजारांना खतपाणी मिळाले आहे आणि मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळेच प्रकर्षाने कमतरता जाणवते ती प्रतिकारशक्तीची आणि कणखरपणाची. या दोन्ही गोष्टी योगसाधनेमुळे शक्य होतात. अनेक अभ्यासांनुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगाचा प्रभाव सिद्ध झाला आहे.

निरोगी जीवनशैली ः निकोप अशा जीवनशैलीचा विचार योगप्रणालीत चांगल्यी रीतीने केलेला आहे. योग म्हणजे शारीरिक व्यायाम, श्वास घेण्याच्या पद्धती आणि एकाग्रता सुधारणेचे संयोजन. जे शरीर आणि मन तंदुरुस्त करते. आहाराकडेही अधिक चांगल्या दृष्टिकोनातून बघायला प्रवृत्त करते. शवासन आणि शशांकासन तणाव कमी करते.

Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर

अवयवांची कार्यक्षमता ः प्राणायामासारख्या श्‍वसनप्रकारामुळे आपल्या श्वसन यंत्रणेची देखभाल होते आणि आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्रिकोणासन रक्तप्रवाह सुधारते आणि सर्व अवयवांचे इष्टतम कार्य सुनिश्चित करते. म्हणूनच, योगाभ्यास करणे केवळ रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास उपयुक्त ठरत नाही, तर मानवी शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठीदेखील आवश्यक आहे.

श्वसनप्रणालीत सुधारणा ः कोविड -१९ ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ज्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे, त्यांनी प्राणघातक विषाणूविरुद्ध लढण्यासाठी योगासन आणि श्वासोच्छ्वासाचा सराव केला पाहिजे, असे कित्येक तज्ज्ञ सुचवत आहेत. विषाणूचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याने श्वसन प्रणाली मजबूत करणे अत्यावश्यक आहे. सुचविलेले योग आसन आदर्श संपृक्त पातळी गाठण्यात आणि फुफ्फुसाची कार्ये पूर्ववत करण्यात मदत करतात.

मानसिक शांतता ः योगाभ्यास करण्याचा सल्ला केवळ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनाच नाही, तर विषाणूंपासून बरे झालेल्या रुग्णांनाही दिला जातो. योगिक श्वासोच्छ्वास, प्राथमिक स्तरावर आसन आणि ध्यानधारणेमुळे मानसिक शांतता मिळते आणि कोविड -१९ चा क्लेशकारक अनुभव घेणाऱ्या रुग्णांना संपूर्ण शरीराला आरामदायक वाटते.

Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
Daily योग : ध्यान का केलं जातं?; जाणून घ्या फायदे
ANI

आज, जेव्हा जग ठप्प झाले आहे, तेव्हा आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि अंतर्गत आत्म-संतुलन राखण्यासाठी योग एक सर्वात प्रभावी आरोग्य सराव म्हणून उदयास आला आहे. योगाला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. तो भारताचा सौम्य शक्तिस्रोत बनला आहे. कोविड नसताना आपण सर्वानी मन, तन आणि आत्मा एकरूप करणारा हा उत्सव एकत्रितपणे औत्सुक्याने आणि उत्साहाने साजरा केला असता. तथापि, कोविड -१९मुळे आपण आपल्या घरात राहून सुरक्षिततेचे अंतर, नियम पाळले पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. मी सर्व नागरिकांना आणि लहान मुलांना आवाहन करतो, की विषाणूमुळे आपल्या उत्साहावर विरजण पडू नये. या कठीण काळात शांतता प्राप्त करण्यासाठी चला आपण सर्व जण आपापली चटई घेऊन आपल्या अंतरात्म्यातील ज्योत चेतवण्यासाठी हा योग दिवस साजरा करण्यास सुरुवात करूया.

Yoga Day 2021 : मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
Daily योग: जाणून घ्या, दंडासनाचे फायदे

पालक, शिक्षकांना आवाहन

योगाचे फायदे केवळ प्रौढांपुरतेच मर्यादित नाहीत, तर मुलांनाही योगामुळे त्यांच्यात आलेल्या तणावाचा सामना करण्यास मदत होते. कोविडने सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि शैक्षणिक अशा सर्व स्तरांवर आमच्या मुलांचे नुकसान केले आहे. मुले आणि तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने या साथीमुळे झालेल्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहेत. मी सर्व पालक आणि शिक्षकांना आवाहन करतो, की त्यांनी लहान मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योगासन करण्यास प्रवृत्त करावे. योगाचा सराव केल्यामुळे मुले स्वतःशी अधिक तादात्म्य पावतील आणि त्यांची शक्ती, लवचिकता आणि समन्वय वाढवू शकतील. या व्यतिरिक्त, या आव्हानात्मक काळामध्ये योगाद्वारे तरुणांची एकाग्रता सुधारण्याबरोबरच त्यांची शांतता आणि विरंगुळ्याची भावना कायम राखून त्यांना अधिक लाभ मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com