esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आषाढ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री ९.५६, चंद्रास्त सकाळी ९.०६, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, अंगारक चतुर्थी, भारतीय सौर श्रावण ५ शके १९४३.

दिनविशेष -

१८९५ - ज्येष्ठ बीनकार उस्ताद बंदे अली खाँ यांचे निधन. ते किराणा घराण्याचे प्रवर्तक मानले जातात. अत्यंत सूक्ष्म स्वरांचे भान असणारे, मधुर वादन करणारे, असा त्यांचा लौकिक होता. ते ध्रुपदगायकही होते. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात बंदे अली खाँ यांची कबर आहे.

१९११ - जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ, अन्न व पोषण याविषयी मूलभूत विचार मांडणारे आहारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म.

१९२५ - पुणे रेल्वे स्थानक या वास्तूचे मुंबई इलाख्याचे ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली आर्म विल्सन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ही वास्तू आज ८१ व्या वर्षांत प्रवेश करीत आहे.

१९७५ - गांधीवादी नेते व माजी खासदार त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन. भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतर तत्परतेने करून २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हाती देण्याचे काम त्यांनी केले.

दिनमान -

मेष : जुन्या आठवणींना उजाळा देवू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीत निर्णय पुढे ढकला.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.

कन्या : आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

तुळ : आर्थिक सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. विरोधकांवर मात कराल.

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अपेक्षित सहकार्य लाभेल.

मीन : धार्मिक कार्यात सहभाग. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

loading image
go to top