Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 मे 2021

पंचांग - रविवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री ११.१९, चंद्रास्त सकाळी ९.४१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४३.

पंचांग -

रविवार : वैशाख कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री ११.१९, चंद्रास्त सकाळी ९.४१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४३.

दिनविशेष -

२००४ - सन १९९९ मध्ये ‘ऑपरेशन विजय’च्या काळात बटालिक क्षेत्रातील खालुबार हिल्स पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यातून परत मिळवताना वीरमरण आलेले कॅप्टन मनोजकुमार पांडे यांच्या तैलचित्राचे ‘एनडीए’मधील ‘माइक स्क्वॉर्डन’ येथील सभागृहात अनावरण. या सभागृहासही कॅप्टन पांडे यांचे नाव देण्यात आले आहे. कॅप्टन पांडे यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ हा सन्मान देण्यात आला होता. कॅप्टन पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ९० व्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते.

१९३४ - मुंबई येथे नभोवाणी केंद्राची सुरुवात.

१९५० - प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे संशोधक व पुरातत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. त्यांचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ.

१९९३ - ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना ‘त्रिदल’ संस्थेच्या वतीने ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान.

दिनमान -

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक व वैचारिक प्रगती होईल.

तूळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : नवा मार्ग व नवी दिशा सापडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

धनू : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी चिंता लागून राहील.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com