esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ३.३७, चंद्रास्त दुपारी ४.१५, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४३.

दिनविशेष -

१९१७ - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

१९२० - नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शैलीकार लेखक, प्रभावशाली वक्ते प्रा. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म. डॉ. नीलकंठ रथ यांच्यासह त्यांनी लिहिलेल्या ‘भारतातील दारिद्य्र’ या ग्रंथामुळे ते अतिशय गाजले होते.

१९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. त्यांचे ‘हीररांझा’, ‘आखरी खत’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘फंटूश’, ‘टॅक्‍सी ड्रायव्हर’ आदी चित्रपट लोकप्रिय होते.

२००२ - ज्येष्ठ उद्योगपती आणि ‘रिलायन्स’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी यांचे निधन.

दिनमान -

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार पार पडतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.

कर्क : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. दगदग जाणवेल.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

धनु : वाहने सावकाश चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. कामे मार्गी लागतील.मानसिक स्वास्थ्य लाभेल.

loading image