Inspiring cab driver story : शाळेच्या व्हॅनपासून रात्रीच्या कॅबपर्यंत; पोरासाठी झटणाऱ्या या चालकाची हृदयस्पर्शी कहाणी

Life Lessons from Common People : मध्यरात्रीच्या प्रवासात भेटलेल्या एका कॅब चालकाचा सेवाभाव आणि त्याने मांडलेले त्याचे जीवनदर्शन, लेखकाच्या मनातील शंका दूर करून मानुसकीचे दर्शन घडवणारा हा अंतर्मुख करणारा अनुभव नक्कीच प्रेरणादायी असून सर्वांनी वाचायला हवा.
Life Lessons from Common People

Life Lessons from Common People

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

मी व्हॅन बंद केल्यावर त्याच्या माउलीने फोन केला. काकुळतीला येत म्हन्ली, काका, सौरभ शाळेत जायला मागत नाहीये. तुम्हीच हवे त्याला. माउलीने पोराला लय समजावलं, पन तो काई ऐकेना. पुन्हा तिची, तिच्या मिस्टरांची नोकरी. तिने मला गळ घातली फार... झालो तयार मग... पोरांची शेवा म्हणजे पांडुरंगाची शेवा शेवटी.’

एकदा मला कामाकरता बाहेरगावी जायचं होतं. ट्रेनचं आरक्षण केलं होतं. पण माझी ट्रेन चांगली साडेआठ तास लेट झाल्यामुळे ती पुणे स्टेशनला मध्यरात्रीनंतर येणार होती. मी मनाची तयारी केली होती, पण व्हायची ती चिडचिड झालीच. कारण आता आडनिड्या वेळेमुळे झोपेचं भरीत होणार होतं आणि त्यात भर म्हणजे प्रवास करायचा म्हटल्यावर येणारी ॲक्झँयटी!

ॲपवरून टॅक्सी बुक केली. काही मिनिटं गेली. आडनिडी वेळ असल्यामुळे भाडं नेहमीपेक्षा जास्त असणार हे गृहीत धरलं होतंच. काही मिनिटांत टॅक्सीचा क्रमांक आणि चालकाचं नाव, त्याचा फोटो इत्यादी तपशील स्क्रीनवर उमटला. बरेचदा अशा वेळेस टॅक्सी मिळत नाही, किंवा कॅन्सल केली जाते आणि धावपळ करावी लागते असा अनुभव एकदा-दोनदा आल्याने एक दिव्य पार पडलं असं म्हणून हुश्श केलं. काही सेकंदांत कॅब जवळ आल्याचं मोबाइलवरच्या मॅपवर दिसलं. बॅगा घेऊन गेटपाशी गेलो तोच टॅक्सी समोर उभी. माझ्याकडचं सामान पाहून चालक बाहेर आले. त्यांनी डिक्की उघडली आणि बॅगा ठेवायला मदत केली. त्यांच्याकडे मी पाहिलं आणि मनात शंकेची पाल चुकचुकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com