Vidhan Sabha 2019 : विखे-पाटलांच्या भाजपप्रवेशामुळे नगरमध्ये होणार मोठा बदल?

ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

निवडणुकीच्या अगोदरच नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. त्यामुळे भाजपला बळकटी मिळाली. त्यातही विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने त्यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

निवडणुकीच्या अगोदरच नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. त्यामुळे भाजपला बळकटी मिळाली. त्यातही विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने त्यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, पक्षाचे नेतृत्व करणारा एक म्होरक्‍याच गारद झाल्याने कॉंग्रेसचे नेते चिंतेत आहेत.

पारनेर विधानसभा मतदारसंघातून मीच नवरदेव असेल, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी घेतली आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे व वसंत चेडे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हेदेखील प्रयत्नशील आहेत. श्रीगोंदे मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट लक्ष पुरविल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप विजयी झाले. त्या वेळी बबनराव पाचपुते यांच्या विरोधकांची मोट बांधण्यात पवार यशस्वी झाले होते. या वेळी जगतापच भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यापुढे राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी असेल, असे खुद्द पालकमंत्री राम शिंदे यांनीच सांगितले. मात्र, त्यांनाही विरोधकांचा सामना करावा लागेल.

Vidhan Sabha 2019 : अवघ्या 30 दिवसांत 5 वर्षांच्या कामाचा निकाल

नेवासे मतदारसंघातून भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत सचिन देसर्डा व नितीन दिनकर यांनी उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या सर्वांसमोर क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे तगडे आव्हान असेल. राहुरी मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार शिवाजी कर्डिले यांनाच उमेदवारी असेल, असे संकेत खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले आहेत. तथापि, भाजपतर्फे इच्छुक असलेल्या सत्यजित कदम यांना रोखण्याचे आव्हान कर्डिले यांच्यासमोर आहे.

Vidhansabha 2019 : मनसेही आता उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

श्रीरामपूर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी अलिकडेच शिवबंधन बांधले. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी सुरू केली आहे. शिर्डी मतदारसंघातून कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून या मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद क्षीण झाली. त्यात कॉंग्रेसतर्फे उमेदवारी करण्यात येथून कोणीच दावेदार नसल्याने येथून कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीच तयारी करावी, अशी पक्षातर्फे त्यांना गळ घातली जात आहे. कोपरगाव मतदारसंघातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी आव्हान दिले आहे.

उदयनराजेंना मिळाला राजकीय ब्रिदिंग पिरियड

संगमनेर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात नेतृत्व करीत आहेत. त्यांच्याशी तगडी लढत देईल, असा नेताच सध्या तरी विरोधकांकडे नाही. अकोल्यातून ज्येष्ठ नेते मधुकर व आमदार वैभव पिचड अलिकडेच भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. तथापि, अशोक व त्यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांचा हिरमोड झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bal J Bothe Patil Writes about Ahmednagar Politics Maharashtra Vidhan Sabha 2019