

दिलीप नाझरे यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. १५ लेखांच्या या पुस्तकात नाझरे यांनी आयुष्यातील विविध अनुभवांना कल्पनेची जोड देऊन शब्दबद्ध केले आहे. हे लेख नुसते अनुभवकथन नसून त्याला चिंतनाची जोड आहे आणि त्याचबरोबर नाझरे यांचे प्रचंड वाचन, इंग्रजी साहित्याची ओढ या लेखांतून दिसते.