
अरविंद रेणापूरकर
arvind.renapurkar@esakal.com
भारतीय ग्राहकांची मानसिकता आणि प्रदूषणाची स्थिती पाहता गेल्या काही वर्षांत अनेक नामांकित वाहन कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या सीएनजी श्रेणी बाजारात आणल्या. यात टाटा, ह्युंदाई, मारुती, टोयोटा यासह विविध कंपन्यांचा उल्लेख करता येईल आणि त्यांच्या सीएनजी श्रेणीतील मोटार आता भारतीय रस्त्यांवर सुसाट धावत आहेत. सीएनजी वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी सीएनजी स्थानकाचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. जानेवारी २०२५ पर्यंत देशात ७,५०० पेक्षा अधिक सीएनजी पंप कार्यरत असल्याची नोंद आहे आणि ही संख्या २०३० पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा संकल्प आहे.