
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 एप्रिल 2021
पंचांग
१९ एप्रिल २०२१, सोमवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/ कर्क, चंद्रोदय सकाळी ११.२५, चंद्रास्त रात्री १.०५, सूर्याला दवणा वाहणे, अशोक कलिका प्राशन रात्री १२.०२ नंतर, वृषभायन, ग्रीष्मऋतू प्रारंभ, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र २९ शके १९४३.
दिनविशेष
१८९२ : भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक; तसेच आदिवासी समाजामध्ये शिक्षणकार्य करणाऱ्या थोर समाजसेविका ताराबाई मोडक यांचा जन्म.
१९१० : नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याच्या हत्येबाबत क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे यांना फाशी देण्यात आली.
१९७५ : 'आर्यभट्ट' हा संपूर्ण भारतीय बनावटीचा भारतातील पहिला उपग्रह १९७५ मध्ये रशियातील अंतराळ स्थानकावरून अंतराळात प्रक्षेपित.
१९८७ : ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत पां. वा. गाडगीळ यांचे निधन. १९९३ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.
हेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)
राशिभविष्य
मेष: जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पार पडतील. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.
मिथुन: तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क: व्यवसायात फार मोठे धाडस करण्याचे टाळावे. आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह: मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील.
कन्या: आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सार्वजनिक मानसन्मान लाभेल.
तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनू : प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर: काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. शत्रुपीडा जाणवणार नाही.
कुंभ: संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मीन: नोकरीत उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Web Title: Daily Horoscope 19 April 2021
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..