esakal | आजचे पंचांग आणि राशिभविष्य - २३ एप्रिल २०२१

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

शुक्रवार चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.९३, सूर्यास्त ६.५२,

आजचे पंचांग आणि राशिभविष्य - २३ एप्रिल २०२१
sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग - २३ एप्रिल २०२१

शुक्रवार चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.९३, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय दुपारी ३.१२, चंद्रास्त पहाटे ४.०७, कामदा एकादशी, श्रीकृष्ण दोलोत्सव, भारतीय सौर वैशाख ३ शके १९४३.

दिनविशेष - २३ एप्रिल

जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन

१५६४ - जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्‍सपिअर यांचा जन्म. याच तारखेला १६१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जगातील बहुतेक भाषांत त्यांच्या नाटकांची भाषांतरे किंवा रूपांतरे होऊन ती रंगभूमीवर आली आहेत.

१८५० - प्रसिद्ध इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन.

१८५८ - परित्यक्ता, विधवा यांच्यासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या महाराष्ट्रीय विदुषी पंडिता रमाबाई यांचा जन्म.

१८५८ - "क्वांटम थिअरी' मांडणारे जर्मन शास्त्रज्ञ मार्क्‍स कार्ल एन्स्टर्ट लूटविक प्लांक यांचा जन्म. 1918 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.

१८७३ - गेल्या शतकातील प्रसिद्ध कवी, लेखक व प्रवचनकार विठोबा अण्णा दप्तरदार यांचे निधन.

१८७३ - अस्पृश्‍यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म.

१९५८ - समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे संशोधन करून प्रकाशन करणारे समर्थभक्त नानासाहेब देव यांचे निधन.

१९६८ - पतियाळा घराण्याचे महान गायक उस्ताद बडे गुलाम अली खॉं यांचे निधन. त्यांच्या "याद पियाकी आये', "का करू सजनी' वगैरे ठुमऱ्या अजूनही लोकप्रिय आहेत.

१९९२ - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचे निधन. "भारतरत्न' पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

१९९३ - केंद्रीय जलसंपत्ती मंत्रालयाचे माजी सचिव आणि प्रसिद्ध जलसंधारण तज्ज्ञ माधवराव चितळे यांची "स्टॉकहोम पुरस्कारा'साठी निवड.

१९९५ - ज्येष्ठ चरित्र अभिनेते दीनानाथ टाकळकर यांचे निधन. "तरुण तुर्क म्हातारे अर्क', "चांदणे शिंपीत जा' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

१९९७ - दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील महान खेळाडू आणि इंग्लिश क्रिकेटमध्ये गोल्डन बॉय म्हणून ओळखले गेलेले डेनिस कॉम्प्टन यांचे निधन.

१९९९ - डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगाद्वारे "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये स्थान प्राप्त केले. "वऱ्हाड'चे सर्वाधिक १९३० प्रयोग केल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश गिनेस बुक मध्ये झाला.

२००० - मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली चाळीस वर्षे "भारतमाता' चित्रपटगृह चालविणारे यशवंतराव सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.

२००१ - विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ पत्रकार जयंतराव टिळक यांचे निधन. राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तसेच तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग, शिकार आदी विविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य संस्मरणीय ठरले.

२००१ - जीसॅट-१ या भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा ११ हजार ९०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात "इस्रो'च्या अवकाशशास्त्रज्ञांना यश.

२००२ - "पाणी पंचायती'चे संस्थापक विलासराव बळवंतराव साळुंखे यांचे निधन. शेतकऱ्यांना पाण्याचा समान हक्क मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी लढा दिला. पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथे पडीक जमिनीवर त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास व त्याआधारे शेती सिंचन विकास हे काम सुरू केले. हे काम "नायगाव पॅटर्न' म्हणून गाजले. जमनालाल बजाज पुरस्कार, स्वीडनमधील इंटरनॅशनल इन्व्हेंटर्स ऍवॉर्ड, सांगलीचा कॉम्रेड दत्ता देशमुख पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

२००३ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्रभूषण' पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य केल्याबद्दल डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.

हेही वाचा: कसली घाई होती? निधनाच्या अफवेवर सुमित्रा महाजन यांचा सवाल

राशिभविष्य

मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तूळ : अनेकांबरोबर सुसंवाद. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

धनू : भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : महत्वाची कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.