आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 जून 2021

पंचांग - गुरुवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री २.०२, चंद्रास्त दुपारी १.२६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

गुरुवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री २.०२, चंद्रास्त दुपारी १.२६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४३.

दिनविशेष -

१८९० : िचत्रपटनिर्माते, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर ( बाबूराव कृष्णराव मेस्त्री) यांचा जन्म.

१८९० : महात्मा गांधींचे कडवे अनुयायी व वायव्ह सरहद्द प्रांतातील पख्तूनांचे नेते खान अब्दुल गफारखान यांचा जन्म. त्यांना ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखत असत. १९८७ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला.

१८९२ : जुन्या पिढीतील लेखिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म.

१९९७ : भारतीय कृषी संशोधन संस्थेतील उपसंचालक डॉ.ई.ए.सिद्दिकी यांना भारतात संकरित तांदळाची जात विकसित करण्याच्या कामाबद्दल भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा रजतमहोत्सवी पुरस्कार जाहीर.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : सार्वजनिक कामात सहभागी व्हाल. व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल.

कर्क : दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. गुरूकृपा लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. मनोबल उत्तम राहील.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मकर : अचानक धनलाभ संभवतो. भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : दुपारनंतर कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com