esakal | Horoscope : आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : अश्विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सकाळी ८.०६, चंद्रास्त सायंकाळी ७.५५, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, मु. रबिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन १६ शके १९४३.

दिनविशेष -

भारतीय वायुसेना दिन

२००३ - अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एंजल आणि ब्रिटनचे क्लाईव्ह ग्रेंजर यांना आर्थिक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

२००४ - केनियातील ‘ग्रीन बेल्ट मूव्हमेंट’च्या प्रणेत्या व पर्यावरण उपमंत्री वनगारी मथाई यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर. आफ्रिका खंडातील महिलेला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

२००७ - ‘जीन्स टार्गेटिंग’ या अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापर करून ‘शोभिवंत उंदरा’ची (डिझायनर माउस) निर्मिती करणाऱ्या तीन संशोधकांना वैद्यक क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००९ - रुमानियात जन्मलेल्या जर्मनीच्या हार्टा म्युलर यांना साहित्याचे नोबेल जाहीर.

२०१४ - सूक्ष्मदर्शीमधून पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे सखोल स्वरूपात निरीक्षण करता येण्याची नवी पद्धत विकसित केल्याबद्दल अमेरिकेच्या एरिक बेटझिंग, विल्यम मॉर्नर आणि जर्मनीच्या स्टीफन हेल या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर.

दिनमान -

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी. गडी नोकर-चाकरांबरोबर सुसंवाद.

वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवासामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव. संततीचे प्रश्‍न मार्गी.

तूळ : पत्नीचा सल्ला लाभदायक. आपली मते इतरांना पटवून द्याल.

वृश्‍चिक : भागीदारीतील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. कामाचा ताण जाणवेल.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

loading image
go to top