esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscoepe and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : भाद्रपद शुद्ध ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय सकाळी ११.२०, चंद्रास्त रात्री १०.४९, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.३८, सूर्यषष्ठी, ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी ९.५० नं., श्री बलराम जयंती, सूर्यषष्ठी, कार्तिकेय दर्शन, भारतीय सौर भाद्रपद २१ शके १९४३.

दिनविशेष -

१९२६ - मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि ‘महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन. १८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.

१९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. जुलमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद मुक्त केले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे ‘पोलिस ॲक्‍शन’ असे वर्णन केले जाते.

१९५२ - सवाई गंधर्व ऊर्फ रामचंद्र गणेश कुन्दगोळकर यांचे निधन. पै. खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे ते शिष्य होते. कै. दादासाहेब खापर्डे यांनी उमरावतीस जाहीरपणे ‘सवाई गंधर्व’ अशी पदवी दिली होती.

१९८० - चित्रपटसृष्टीतील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. ‘अंमलदार’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘हिरा जो भंगला नाही’, ‘नटसम्राट’, ‘ती फुलराणी’, ‘सूर राहू दे’ या नाटकांतील तसेच ‘सिंहासन’, ‘चांदोबा, चांदोबा भागलास का’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रूंवर मात कराल.

loading image
go to top