आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 मे 2021

पंचांग - शुक्रवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ७.४२, चंद्रास्त रात्री ९.१८, सूर्योदय : ६.०२, सूर्यास्त : ६.५९, अक्षय तृतीया, श्रीबसवेश्वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४३.
Astrology and Horoscope
Astrology and HoroscopeSakal

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ७.४२, चंद्रास्त रात्री ९.१८, सूर्योदय : ६.०२, सूर्यास्त : ६.५९, अक्षय तृतीया, श्रीबसवेश्वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४३.

दिनविशेष -

१९१८ : कर्करोगाच्या निदानाकरता चाचणी पद्धती शोधून काढणारे ज्येष्ठ संशोधक प्रा. माधवराव सहस्रबुद्धे यांचा नागपूर येथे जन्म.

१९२३ : अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद, कायदेपंडित आणि समाजसुधारक नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. वयाच्या बाविसाव्या वर्षी ते ‘इंदुप्रकाश’ या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक झाले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्ष वगैरे पदे त्यांनी भूषविली.

१९२३ : ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म. त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. सरकारने त्यांना पद्मभूषण किताबाने गौरविले.

दिनमान -

मेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

सिंह : नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. एखादी चिंता लागून राहील.

वृश्‍चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com