आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 मे 2021

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ८.२९, चंद्रास्त रात्री १०.१०, सूर्योदय : ६.०२, सूर्यास्त : ६.५९, तिसरी तीज, विनायक चतुर्थी, अगस्ती लोप, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४३.
Astrology and Horoscope
Astrology and HoroscopeSakal

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ८.२९, चंद्रास्त रात्री १०.१०, सूर्योदय : ६.०२, सूर्यास्त : ६.५९, तिसरी तीज, विनायक चतुर्थी, अगस्ती लोप, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४३.

दिनविशेष -

१९५२ : लोकसभेचे पहिले सभापती म्हणून ग. वा. तथा दादासाहेब मावळंकर यांची निवड. मुंबई विधानसभेचे पहिले सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

१९८० : संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस गोदावरी’ या पाणबुडीचे माझगाव गोदीत जलावतरण.

१९९३ : स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय लष्करप्रमुख, फील्ड मार्शल के.एम.करिअप्पा यांचे निधन.

१९९४ : जागतिक हौशी स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेतील पहिला व एकमेव भारतीय विजेता ओम आगरवाल यांचे निधन.

१९९४ : प्रसिद्ध चित्रकार व कॅलेंडर चित्र निर्मितीतील अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.

२००० : जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.

२००४ : गेली सहा-सात दशके डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचा विचार लोकगीते आणि शाहिरीतून सांगणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे निधन.

दिनमान -

मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मनोबल कमी राहील.

धनु : वैवाहिक जीवनात विसंवाद संभवतो. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल.

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com