आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 ऑक्टोबर 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनमान -

मेष : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृषभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कामाचा ताण जाणवेल.

दिनविशेष -

जागतिक अन्नदिन

1854 - आयरिश विनोदकार, नाटककार, कवी आणि "कलेसाठी कला' या मताचे कट्टर पुरस्कर्ते ऑस्कर वाइल्ड यांचा जन्म. त्यांच्या नाटकांची मराठी रूपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत "दूरचे दिवे' हे "ऍन आयडियल हजबंड'चे रूपांतर आहे. त्यांचे समग्र ग्रंथ 1911 मध्ये 14 खंडात, तर 1936 मध्ये पॅरिसमध्ये चार खंडांत प्रसिद्ध करण्यात आले. "द वर्क्‍स ऑफ ऑस्कर वाइल्ड' या नावाने 1963 मध्ये त्यांचे साहित्य संकलित झाले.

1905 - बंगाल प्रांताचे विभाजन होऊन पूर्व बंगाल व आसाम राज्याची निर्मिती झाली.

1948 - नगरपालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेल्या "म्युनिसिपालिटी' या नाटकाचे लेखक माधवराव जोशी यांचे निधन. या नाटकातील "आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी' हे गाणे वाक्‍प्रचारासारखे मराठीत रूढ झाले आहे. जळगाव येथे भरलेल्या 34 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

1948 - 70-80 च्या दोन दशकांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री, कुशल नृत्यांगना, चित्रपट-टीव्ही मालिकांची निर्माती-दिग्दर्शिका, राज्यसभेची सदस्य हेमामालिनी यांचा जन्म. त्यांना 1999 मध्ये भारत सरकारने "पद्मभूषण" पुरस्कार देऊन गौरविले.

1950 - पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. ग. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.

1994 - विसर्जित सोव्हिएत संघराज्याचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांना जागतिक शांततेसाठीचा "उ थांट शांतता पुरस्कार' प्रदान.

1997 - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता गोर्ले यांचे निधन.

1997 - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस.डिव्होट्टा यांना अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण संस्थेचा "स्ट्रेटोस्पिअर ओझोन प्रोटेक्‍शन ऍवॉर्ड' हा पुरस्कार जाहीर.

1998 - उत्तर आयर्लंडमधील जॉन ह्यूम आणि डेव्हिड ट्रिंबल हे प्रतिस्पर्धी राजकीय नेते शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कार मानकरी ठरले. गेल्या तीस वर्षांत सुमारे 3600 लोकांचे बळी घेणाऱ्या वांशिक संघर्षात शांततापूर्ण तोडगा शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराची पावती मिळाली आहे.

1999 - जागतिक व्यावसायिक बिलियर्डस आणि स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्डस्‌ खेळाडूसाठी दिला जाणारा "फ्रेड डेव्हिस पुरस्कार' भारताच्या गीत सेठीला देण्यात आला. असामान्य कामगिरीसाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारा गीत सेठी हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

2002 - ज्येष्ठ कादंबरीकार ना.सं.इनामदार यांचे निधन. "झेप', "मंत्रावेगळा', "राऊ' या कादंबऱ्यांसाठी इनामदारांना समीक्षकांकडून व रसिकांकडून मान्यता मिळाली. नगर येथे झालेल्या सत्तराव्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

2003 - पृथ्वीला तब्बल चौदा फेऱ्या मारून पहिला चिनी अंतराळवीर (टायकोनॉट) यांग लिवेई याचे "शेन्झाऊ - 5' हे यान इनर मंगोलियातील तळावर सुखरूप उतरले आणि पहिली मोहीम यशस्वी झाल्याच्या आनंदात चीनमध्ये अक्षरशः जल्लोष झाला.

loading image
go to top