आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 मे 2021

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध ११/१२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय दुपारी ३.५३, चंद्रास्त पहाटे ४.०४, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४३
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

रविवार : वैशाख शुद्ध ११/१२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय दुपारी ३.५३, चंद्रास्त पहाटे ४.०४, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४३

दिनविशेष -

१९३३ : ज्येष्ठ मुद्रितशोधक मोहन वेल्हाळ यांचा जन्म. ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व सौष्ठवपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे.

१९५६ - आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

१९८४ : बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे ‘एव्हरेस्ट’ शिखरावर यशस्वी पदार्पण. ‘एव्हरेस्ट’वरील प्रवासात २४००० फुटांवर असताना बचेंद्रीच्या पथकाला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले. सरकारने १९८४ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने व नंतर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. तिचे ‘माय जर्नी टू दी टॉप’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

१९९७ : माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणाऱ्या दोघांपैकी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.

१९९९ : भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याने सलग दुसऱ्या वर्षी ‘चेस ऑस्कर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकाविला.

दिनमान -

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : संततिसौख्य उत्तम राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

धनू : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. कामात सुयश लाभेल.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com