आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 मे 2021

पंचांग - मंगळवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती/विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त पहाटे ५.३९, श्रीनृसिंह जयंती, सूर्याचा रोहिणी नक्षत्रप्रवेश, वाहन – मेंढा, पौर्णिमा प्रारंभ रात्री ८.३०, भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४३.
Astrology and Horoscope
Astrology and HoroscopeSakal

पंचांग -

मंगळवार : वैशाख शुद्ध १४, चंद्रनक्षत्र स्वाती/विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त पहाटे ५.३९, श्रीनृसिंह जयंती, सूर्याचा रोहिणी नक्षत्रप्रवेश, वाहन – मेंढा, पौर्णिमा प्रारंभ रात्री ८.३०, भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४३.

दिनविशेष -

१९१४ : स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार कार्यकर्ते, प्रभावी पत्रकार, राज्याचे माजी मंत्री व विधानसभेचे भूतपूर्व सभापती, वारकरी पंथाचे प्रणेते आणि मानवतावादी नेते बाळासाहेब भारदे यांचा जन्म.

१९९८ : चित्रपटसृष्टीत गेली चार दशके सातत्याने लोकप्रिय संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांत यांचे निधन. साडेचारशेहून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

१९९८ : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण.

१९९९ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) माजी संचालक डॉ. बी. डी. टिळक यांचे निधन.

दिनमान -

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. एखादी चिंता लागून राहील.

मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अनुकूलता लाभेल.

वृश्‍चिक : वादविवाद शक्यतो टाळावेत. काहींना कामाचा ताण जाणवेल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. गुरूकृपा लाभेल.

मकर : मान व प्रतिष्ठेचे योग येतील. विरोधकांवर मात कराल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com