esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री २.३८, चंद्रास्त दुपारी ३.२८, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४६, बृहस्पती पूजन, भारतीय सौर भाद्रपद ११ शके १९४३.

दिनविशेष -

कोकोनट डे

१९७६ - प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार, समीक्षक विष्णू सखाराम खांडेकर यांचे निधन. त्यांनी ‘कुमार’ व ‘आदर्श’ या टोपणनावाने कविता व विनोदी लेखनही केले. १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथा संग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रुपककथा, एक नाटक, चरित्रात्मक, समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह हे त्यांचे साहित्य. त्यांना ‘ययाति’ कादंबरीबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

१९९७ - फ्रेंच टेनिस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरलेल्या महेश भूपतीला अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे दोन लाखांचा पुरस्कार जाहीर.

२००४ - किराणा घराण्याच्या गायिका कृष्णा हनगल यांचे निधन. विख्यात शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांच्या त्या कन्या होत. त्यांना १९९१-९२ ला राज्य संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

दिनमान -

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कन्या : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान लाभेल.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

loading image
go to top