esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 एप्रिल 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 एप्रिल 2021
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण ४, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय रात्री १०.३७, चंद्रास्त सकाळी ८.५२, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर वैशाख १० शके १९४३.

दिनविशेष -

१८७० - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा त्यांनी तयार केलेला पहिला चित्रपट. त्यांनी लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या ‘लंका दहन’ या चित्रपटाने त्यावेळचे उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले होते.

१९९५ - पुणे येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) संशोधक डॉ. कंदस्वामी सुब्रह्मण्यम यांना पदार्थविज्ञानातील बी. एम. बिर्ला विज्ञान पुरस्कार जाहीर.

१९९६ - थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मृतिमंदिराचे उद्‌घाटन.

२००५ - ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे ८० व्या वर्षांत पदार्पण. त्यांच्या ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘एका तळ्यात होती’, ‘अभंग तुकयाचे’, ‘श्रावणात घननिळा बरसला’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशा अद्वितीय गीतांनी सुगम संगीताला अत्युच्च प्रतिष्ठा मिळवून दिली.

दिनमान -

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. नवा मार्ग, नवी दिशा दिसेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : काहींना प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. वैवाहिक सौख्य लाभेल.

कर्क : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सिंह : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल.

धनू : महत्त्वाची कामे पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावत. अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मीन : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.