esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद शुद्ध २, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ७.२३, चंद्रास्त सायंकाळी ७.५५, चंद्रदर्शन, भारतीय सौर भाद्रपद १७ शके १९४३.

दिनविशेष -

साक्षरता दिन (युनेस्को)

१९३० - शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आणि ‘शारदा’ संस्कृत पत्रिकेचे संपादक पं. वसंतराव गाडगीळ यांचा जन्म. इंटरनेटवरून प्रसिद्ध होणारे ‘शारदा’ हे पहिले संस्कृत ‘ई-नियतकालिक’ आहे. गाडगीळ हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्कृतप्रचारक, शंकराचार्यांच्या शृंगेरी पीठाचे राज्यातील पहिले प्रतिनिधी, राजबागच्या विश्‍वशांती गुरुकुलाचे मार्गदर्शक आहेत.

१९३३ - संगीतरसिकांना गेली अनेक वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. त्यांनी देशातील जवळजवळ सर्व भाषांतून तसेच इंग्रजी आणि रशियन भाषेतूनही गाणी गायली आहेत.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तूळ : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

धनू : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : हितशत्रूंवर मात कराल. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

loading image
go to top