esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : भाद्रपद शुद्ध ३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ८.२०, चंद्रास्त रात्री ८.३५, हरितालिका तृतीया, स्वर्णरौरी व्रत, वराह जयंती, सामश्रावणी, मन्वादि, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर भाद्रपद १८ शके १९४३.

दिनविशेष -

१९११ : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख रामचंद्र शंकर तथा रा. शं. वाळिंबे यांचा जन्म.

१९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

१९९४ : लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

१९९७ : युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

दिनमान -

मेष : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंवर मात कराल.

वृषभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. मान व प्रतिष्ठा लाभेल.हितशत्रूंवर मात कराल.

सिंह : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल वाढेल.चिकाटी वाढेल.

तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनू : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

मकर : प्रवास सुखकर होतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : दैनंदिन कामात यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

loading image
go to top