

Deccan Plateau
esakal
अनिकेत यादव-इतिहास अभ्यासक
भारताचा प्राचीन युद्धेतिहास आपण मागील लेखांद्वारे पाहिला, आता भूगोल पाहूया. कारण ‘भूगोल’ हा भल्या भल्या राजवटींचे भाग्य घडवितो, त्यामुळे तो जाणून घेणे आवश्यक आहे. इतिहास हा मानवी पराक्रमाची गाथा असली, तरी हा पराक्रम ज्या रंगमंचावर घडतो, तो रंगमंच ‘भूगोल’ तयार करत असतो. आशिया खंडाच्या दक्षिणेस वसलेल्या या विशाल भरतभूच्या उत्तरेला हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांची एक अभेद्य भिंत आहे. जी आक्रमकांपासून व सायबेरियाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून रक्षण करते.