दणदणाटाची धुंदी!

घटना पुण्यातील खडकीनजीकची आहे. फार राष्ट्रीय महत्त्वाची वगैरे नाही; पण समाज म्हणून, माणूस म्हणून आपण किती संवेदनाहीन पातळीवर उतरलो आहोत,
दणदणाटाची धुंदी!

प्रतिमा जोशी

घटना पुण्यातील खडकीनजीकची आहे. फार राष्ट्रीय महत्त्वाची वगैरे नाही; पण समाज म्हणून, माणूस म्हणून आपण किती संवेदनाहीन पातळीवर उतरलो आहोत, काहीही साजरे करण्याच्या आपल्या कल्पना किती सवंग आणि क्रूर झाल्या आहेत, नागरिक म्हणून आपण किती तळाच्या श्रेणीत बसविण्याच्या लायकीचे आहोत, यावर प्रकाश टाकणारी ही घटना आहे.

हे घडले आहे एका ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत. या काकांच्या शेजारच्या घरात त्यांच्या मुलाचे लग्न होते. या निमित्ताने हळदी व इतर समारंभासाठी नवऱ्यामुलाचे मित्र व काही नातेवाईक जमले होते.

हल्ली कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी असतो तसा डीजे याही शेजाऱ्यांनी लावला होता. अर्थातच मोठ्ठा आवाज करत, कारण त्याशिवाय लग्न गाजणार कसे ना! त्याच्या तालावर नाचत असणाऱ्या लोकांना आपले हे काका कानठळ्या बसत आहेत, आवाज कमी करा, असे सांगू लागले;

पण डीजेची धुंदी चढली असल्याने नवरदेव आणि त्याचे मित्र यांनी अपमानकारक भाषा वापरत काकांना तेथून हुसकावून लावले आणि धूमधडाक्यात नाचगाणी बराच वेळ चालूच राहिली. काका पुन्हा त्यांना आवाज कमी करा सांगायला गेले.

दणदणाटाची धुंदी!
Pune Ajit Pawar : जातीधर्माचे राजकारण आणू नका; अजित पवार

या वेळी नाचगाण्याची आणि डीजेची धुंदी पुरेपूर चढली असावी... नवऱ्यामुलासह त्याच्या मित्रांनी काकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काकांचे कुटुंबीय वाद सोडविण्यासाठी गेले तर त्यांनाही मारहाण केली. खुद्द नवरदेवाने काकांच्या मुलाला डोक्यात कोयता मारला.

या मुलाने पोलिसात तक्रार केली, तर त्या रागाने काकांना पुन्हा मारहाण केली. हे सारे सहन न होऊन काकांनी बंडगार्डन पुलावरून नदीत उडी मारून जीव दिला. पुढची अजब बाब म्हणजे नवऱ्या मुलाला अटक होणार, हे स्पष्ट झाल्याने मुलीकडील माणसांनी पोलिसांना विनंती केली...

काय? तर लग्न लागून जाऊ द्या. त्यानंतर त्याला अटक करा. एखादी व्यक्ती अपमानित होऊन जीव द्यायला जावी इतकी मारहाण करणारा नवरदेव आपल्या मुलीला सुखाने नांदवेल का, अशी उलट झडती त्यांनी घेतली नाही, हेही लक्षात घेण्याजोगे! असो, तर त्या विनंतीनुसार लग्न लागले आणि नवरदेव सर्व अर्थांनी चतुर्भुज झाला.

दणदणाटाची धुंदी!
Mumbai Metro : कुलाबा-बांद्रा-सीप्झ मेट्रो-३ मान्सूनपूर्व उपायोजनांसह सज्ज

या साजरे करण्याने काय साधले? तर एका माणसाचा नाहक जीव गेला, ज्येष्ठ नागरिकाला अपमानित व्हावे लागले, त्यांच्या नातेवाइकांना मारहाण झाली. भर लग्नमंडपात नवऱ्यामुलाला अटक झाली...

भावी संसाराची स्वप्ने पाहत बोहल्यावर असतानाच नववधूच्या त्या स्वप्नांना चूड लागली, पाव्हण्या-रावळ्यांना वेगळीच वरातीची शोभा पाहावयास मिळाली आणि पुढील कित्येक दिवस चघळायला चमचमीत विषय मिळाला.

शेजारच्या घरात सुतकी वातावरण होतेच, पण लग्नघरातही वेगळे वातावरण नव्हते... इतके सगळे त्या एका डीजेपायी, आनंद विशिष्ट पद्धतीने साजरा करण्याच्या हट्टापायी आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नये, ही जाणीव नसण्यापायी घडले. सेलिब्रेशन या नावाखाली आपले मेंदू किती बोथट झाले आहेत, याचे हे एक ठसठशीत उदाहरण आहे.

बारसे असो की वाढदिवस, पार्टी असो की पिकनिक, साखरपुडा असो की लग्न, सत्यनारायणाची पूजा असो की सार्वजनिक उत्सव नि सण समारंभ... निमित्त काहीही असो... कानाचे पडदे फाटतील, हृदयाचे ठोके धडधडू लागतील, रक्तदाब वाढेल, डोके दुखू लागेल, माणूस सैरभैर होईल, आजारी / म्हातारी माणसे नि लहान मुले, पशूपक्षी दचकून बिचकुन अस्वस्थ होतील, अशाच पद्धतीने दणकून साजरे करण्यात आता बहुतेकांना आनंद मिळू लागला आहे.

या आनंदाची नशा इतकी असते की तो आवाज सहन न होणाऱ्या माणसांचे काही ऐकूनच घेतले जात नाही; किंबहुना त्या दणदणाटात काही ऐकूच येत नाही आणि आलेच, तरी मेंदू इतका बधीर झालेला असतो नि दणदणाटप्रिय व्यक्ती इतकी हृदयशून्य बनलेली असते की तक्रार करणाराच मूर्ख ठरतो.

माणूस साधारणपणे ५० डेसिबल इतक्या तीव्रतेचा ध्वनी सहज सहन करतो. ६५ पर्यंत थोडाफार सहन करू शकतो. त्या पुढे मात्र त्याची सहन करण्याची क्षमता नसते. ७५ला आपण सैरभैर होतो आणि १२० डेसिबल म्हणजे गंभीर शारीरिक, मानसिक स्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यात बहिरेपणा येण्यापासून, स्मृतिभ्रंश, हृदयविकार, अगदी मृत्यूपर्यंत वाईट घटना घडू शकतात.

माणसाची सारासार विचार करण्याची, नॉर्मल आयुष्य जगण्याची क्षमता जवळपास नष्ट होऊन जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दिवसा आवाजाची पातळी ६५च्या खाली आणि रात्री ३०च्या खाली असायला हवी; परंतु भारतातील अनेक शहरांत याहून कितीतरी अधिक पातळी असल्याचे दिसते.

सततची वाहनांची रहदारी, त्यांच्या भोंग्यांचे आवाज, रस्ता / इमारती यांची कामे, विविध केबल टाकण्यासाठी रस्ते खणाखणी, ड्रिलिंग, प्लंबिंग, कारखाने वा उघड्यावर चाललेली यंत्रांची कामे आणि त्यांचे आवाज, लाऊड स्पीकर, फेरीवाले, विक्रेते... साध्या कुत्र्याच्या केकटण्याचा आवाज ६० ते ८० डेसिबल इतका असतो. हे सगळे आवाज एकमेकात मिसळून एकत्र येऊन वाढणारी आवाजाची पातळी अनेक ठिकाणी ११५-१२० डेसिबलच्या वर जाते.

भारतातील माणसे आनंदी नसतात, सतत चीड चीड करतात, अस्वस्थ असतात याच्या कारणात अपुरे उत्पन्न, जगण्याची शाश्वती नसणे, छोटी कोंदट घरे, रुढी परंपरा पाळण्याचे बंधन यांच्या बरोबरीने असह्य होणारी आवाजाची पातळी हेही अतिशय महत्त्वाचे कारण आहे.

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनिप्रदूषणग्रस्त शहर आहे. अनेक शहरे कायम उच्च ध्वनिपातळीवर असतात. कोलकाता- ९० डेसिबल, आसनसोल - ८९ डेसिबल, जयपूर - ८३ डेसिबल; तर दिल्ली - ८४ डेसिबलच्या वर कायम असतात.

मुंबईसारख्या महानगरात अनेक ठिकाणी विशिष्ट कालावधीत ही पातळी ११५ - १२० डेसिबलपर्यंत जाते, असे निरीक्षण अनेक दाव्यामध्ये सरकारतर्फेच न्यायालयात मांडले गेले आहे. डॉल्बी सिस्टिमचा आवाज १००च्याही वर जातो. रोज सतत इतक्या तीव्रतेचा आवाज ऐकल्यावर माणसांचे काय होत असेल, याचा विचारच केलेला बरा.

दणदणाटाची धुंदी!
Atpadi Politics : वरिष्ठ पातळीवरून दबाव, पण माणगंगेच्या आखाड्यात पाटलांचेच 'डावपेच' ठरले सरस; मिळवली एकहाती सत्ता

डीजे सोडाच, अनेक प्रसंगी दिवसभर लाऊड स्पीकरवर गाणी अथवा निवेदन लावले जाते. ते सकाळी किती वाजल्यापासून असावे, याचे काही बंधन फारसे कोणी पाळत नाही. गेली काही वर्षे न्यायालयाच्या आदेशामुळे रात्री १० नंतर हे आवाजी सेलिब्रेशन थांबवावे लागते; मात्र आपापल्या घरात किती आवाज करावा, शेजारी पाजारी यांच्या कानांवर किती तीव्रतेचा आवाज पडावा, यावर फारशी बंधने नाहीत. असली तरी ‘आम्ही आमच्या घरात काहीही करू’ अशी मानसिकता दिसते.

शुभकार्य, सार्वजनिक उत्सव हे खरे तर आनंदाचे स्रोत असायला हवे. मनाला शांती देणारे मंद उच्चरण हे वातावरण प्रसन्न करते. शुभकार्यात सर्वांच्या शुभेच्छा/ आशीर्वाद घ्यावे. मात्र बरेचदा परिस्थिती याच्या विपरीत असलेली दिसते.

आपला आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये, कोणाचे कसलेही नुकसान होऊ नये, तीव्र आवाजामुळे होणाऱ्या समस्यांना कोणालाही सामोरे जावे लागू नये, असा विचारसुद्धा मनात येऊ नये म्हणजे आपण जबाबदार नागरिक म्हणून प्रगत देशांच्या कित्येक पातळ्या खाली तर आहोतच; पण सहृदय माणूस म्हणूनसुद्धा आपली गणना होणार नाही, एव्हढे सगळ्यांनीच ध्यानात ठेवलेले बरे.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

घटना पुण्यातील खडकीनजीकची आहे. फार राष्ट्रीय महत्त्वाची वगैरे नाही; पण समाज म्हणून, माणूस म्हणून आपण किती संवेदनाहीन पातळीवर उतरलो आहोत, काहीही साजरे करण्याच्या आपल्या कल्पना किती सवंग आणि क्रूर झाल्या आहेत, नागरिक म्हणून आपण किती तळाच्या श्रेणीत बसविण्याच्या लायकीचे आहोत, यावर प्रकाश टाकणारी ही घटना आहे.

हे घडले आहे एका ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत. या काकांच्या शेजारच्या घरात त्यांच्या मुलाचे लग्न होते. या निमित्ताने हळदी व इतर समारंभासाठी नवऱ्यामुलाचे मित्र व काही नातेवाईक जमले होते. हल्ली कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी असतो तसा डीजे याही शेजाऱ्यांनी लावला होता. अर्थातच मोठ्ठा आवाज करत, कारण त्याशिवाय लग्न गाजणार कसे ना!

त्याच्या तालावर नाचत असणाऱ्या लोकांना आपले हे काका कानठळ्या बसत आहेत, आवाज कमी करा, असे सांगू लागले; पण डीजेची धुंदी चढली असल्याने नवरदेव आणि त्याचे मित्र यांनी अपमानकारक भाषा वापरत काकांना तेथून हुसकावून लावले आणि धूमधडाक्यात नाचगाणी बराच वेळ चालूच राहिली. काका पुन्हा त्यांना आवाज कमी करा सांगायला गेले. या वेळी नाचगाण्याची आणि डीजेची धुंदी पुरेपूर चढली असावी...

नवऱ्यामुलासह त्याच्या मित्रांनी काकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काकांचे कुटुंबीय वाद सोडविण्यासाठी गेले तर त्यांनाही मारहाण केली. खुद्द नवरदेवाने काकांच्या मुलाला डोक्यात कोयता मारला. या मुलाने पोलिसात तक्रार केली, तर त्या रागाने काकांना पुन्हा मारहाण केली. हे सारे सहन न होऊन काकांनी बंडगार्डन पुलावरून नदीत उडी मारून जीव दिला.

पुढची अजब बाब म्हणजे नवऱ्या मुलाला अटक होणार, हे स्पष्ट झाल्याने मुलीकडील माणसांनी पोलिसांना विनंती केली... काय? तर लग्न लागून जाऊ द्या. त्यानंतर त्याला अटक करा. एखादी व्यक्ती अपमानित होऊन जीव द्यायला जावी इतकी मारहाण करणारा नवरदेव आपल्या मुलीला सुखाने नांदवेल का, अशी उलट झडती त्यांनी घेतली नाही, हेही लक्षात घेण्याजोगे! असो, तर त्या विनंतीनुसार लग्न लागले आणि नवरदेव सर्व अर्थांनी चतुर्भुज झाला.

या साजरे करण्याने काय साधले? तर एका माणसाचा नाहक जीव गेला, ज्येष्ठ नागरिकाला अपमानित व्हावे लागले, त्यांच्या नातेवाइकांना मारहाण झाली. भर लग्नमंडपात नवऱ्यामुलाला अटक झाली...

भावी संसाराची स्वप्ने पाहत बोहल्यावर असतानाच नववधूच्या त्या स्वप्नांना चूड लागली, पाव्हण्या-रावळ्यांना वेगळीच वरातीची शोभा पाहावयास मिळाली आणि पुढील कित्येक दिवस चघळायला चमचमीत विषय मिळाला. शेजारच्या घरात सुतकी वातावरण होतेच, पण लग्नघरातही वेगळे वातावरण नव्हते...

इतके सगळे त्या एका डीजेपायी, आनंद विशिष्ट पद्धतीने साजरा करण्याच्या हट्टापायी आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नये, ही जाणीव नसण्यापायी घडले. सेलिब्रेशन या नावाखाली आपले मेंदू किती बोथट झाले आहेत, याचे हे एक ठसठशीत उदाहरण आहे.

बारसे असो की वाढदिवस, पार्टी असो की पिकनिक, साखरपुडा असो की लग्न, सत्यनारायणाची पूजा असो की सार्वजनिक उत्सव नि सण समारंभ... निमित्त काहीही असो... कानाचे पडदे फाटतील, हृदयाचे ठोके धडधडू लागतील, रक्तदाब वाढेल, डोके दुखू लागेल, माणूस सैरभैर होईल, आजारी / म्हातारी माणसे नि लहान मुले, पशूपक्षी दचकून बिचकुन अस्वस्थ होतील,

अशाच पद्धतीने दणकून साजरे करण्यात आता बहुतेकांना आनंद मिळू लागला आहे. या आनंदाची नशा इतकी असते की तो आवाज सहन न होणाऱ्या माणसांचे काही ऐकूनच घेतले जात नाही; किंबहुना त्या दणदणाटात काही ऐकूच येत नाही आणि आलेच, तरी मेंदू इतका बधीर झालेला असतो नि दणदणाटप्रिय व्यक्ती इतकी हृदयशून्य बनलेली असते की तक्रार करणाराच मूर्ख ठरतो.

माणूस साधारणपणे ५० डेसिबल इतक्या तीव्रतेचा ध्वनी सहज सहन करतो. ६५ पर्यंत थोडाफार सहन करू शकतो. त्या पुढे मात्र त्याची सहन करण्याची क्षमता नसते. ७५ला आपण सैरभैर होतो आणि १२० डेसिबल म्हणजे गंभीर शारीरिक, मानसिक स्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यात बहिरेपणा येण्यापासून,

स्मृतिभ्रंश, हृदयविकार, अगदी मृत्यूपर्यंत वाईट घटना घडू शकतात. माणसाची सारासार विचार करण्याची, नॉर्मल आयुष्य जगण्याची क्षमता जवळपास नष्ट होऊन जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दिवसा आवाजाची पातळी ६५च्या खाली आणि रात्री ३०च्या खाली असायला हवी; परंतु भारतातील अनेक शहरांत याहून कितीतरी अधिक पातळी असल्याचे दिसते.

सततची वाहनांची रहदारी, त्यांच्या भोंग्यांचे आवाज, रस्ता / इमारती यांची कामे, विविध केबल टाकण्यासाठी रस्ते खणाखणी, ड्रिलिंग, प्लंबिंग, कारखाने वा उघड्यावर चाललेली यंत्रांची कामे आणि त्यांचे आवाज, लाऊड स्पीकर, फेरीवाले, विक्रेते... साध्या कुत्र्याच्या केकटण्याचा आवाज ६० ते ८० डेसिबल इतका असतो. हे सगळे आवाज एकमेकात मिसळून एकत्र येऊन वाढणारी आवाजाची पातळी अनेक ठिकाणी ११५-१२० डेसिबलच्या वर जाते.

भारतातील माणसे आनंदी नसतात, सतत चीड चीड करतात, अस्वस्थ असतात याच्या कारणात अपुरे उत्पन्न, जगण्याची शाश्वती नसणे, छोटी कोंदट घरे, रुढी परंपरा पाळण्याचे बंधन यांच्या बरोबरीने असह्य होणारी आवाजाची पातळी हेही अतिशय महत्त्वाचे कारण आहे.

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनिप्रदूषणग्रस्त शहर आहे. अनेक शहरे कायम उच्च ध्वनिपातळीवर असतात. कोलकाता- ९० डेसिबल, आसनसोल - ८९ डेसिबल, जयपूर - ८३ डेसिबल; तर दिल्ली - ८४ डेसिबलच्या वर कायम असतात.

मुंबईसारख्या महानगरात अनेक ठिकाणी विशिष्ट कालावधीत ही पातळी ११५ - १२० डेसिबलपर्यंत जाते, असे निरीक्षण अनेक दाव्यामध्ये सरकारतर्फेच न्यायालयात मांडले गेले आहे. डॉल्बी सिस्टिमचा आवाज १००च्याही वर जातो. रोज सतत इतक्या तीव्रतेचा आवाज ऐकल्यावर माणसांचे काय होत असेल, याचा विचारच केलेला बरा.

डीजे सोडाच, अनेक प्रसंगी दिवसभर लाऊड स्पीकरवर गाणी अथवा निवेदन लावले जाते. ते सकाळी किती वाजल्यापासून असावे, याचे काही बंधन फारसे कोणी पाळत नाही. गेली काही वर्षे न्यायालयाच्या आदेशामुळे रात्री १० नंतर हे आवाजी सेलिब्रेशन थांबवावे लागते; मात्र आपापल्या घरात किती आवाज करावा, शेजारी पाजारी यांच्या कानांवर किती तीव्रतेचा आवाज पडावा, यावर फारशी बंधने नाहीत. असली तरी ‘आम्ही आमच्या घरात काहीही करू’ अशी मानसिकता दिसते.

शुभकार्य, सार्वजनिक उत्सव हे खरे तर आनंदाचे स्रोत असायला हवे. मनाला शांती देणारे मंद उच्चरण हे वातावरण प्रसन्न करते. शुभकार्यात सर्वांच्या शुभेच्छा/ आशीर्वाद घ्यावे. मात्र बरेचदा परिस्थिती याच्या विपरीत असलेली दिसते.

आपला आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये, कोणाचे कसलेही नुकसान होऊ नये, तीव्र आवाजामुळे होणाऱ्या समस्यांना कोणालाही सामोरे जावे लागू नये, असा विचारसुद्धा मनात येऊ नये म्हणजे आपण जबाबदार नागरिक म्हणून प्रगत देशांच्या कित्येक पातळ्या खाली तर आहोतच; पण सहृदय माणूस म्हणूनसुद्धा आपली गणना होणार नाही, एव्हढे सगळ्यांनीच ध्यानात ठेवलेले बरे.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com