निरोगीपणा जपण्यासाठी अमेरिकेत करा योगा...! पाहा 5 अप्रतिम स्थळे

Yoga
Yogaesakal

भारतापाठोपाठ योगा स्वीकारलेला देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेत योगा प्रचंड लोकप्रिय आहे. जगभरातून योगप्रेमी अमेरिकेत प्रवासाच्या निमित्ताने जातात. हे ओळखून अमेरिकेने आता पाच स्थळांची योगाच्या अनुषंगाने ओळख निर्माण केलेली आहे. योगप्रेमी प्रवासी या स्थळांना आता आवर्जून भेटी देऊ लागले आहेत. ही नेमकी कोणती स्थळं आहेत, ही ठिकाणं योगासाठी का ओळखली जाऊ लागली आहेत, याची माहिती देणारा हा विशेष लेख...

योगा करण्यामुळे आपले केवळ आरोग्य आणि मन सुधारत नाही तर जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते. त्यात निसर्गाच्या सान्निध्यात योगा सराव करायला मिळाला तर सोन्याहून पिवळे. अमेरिकेतील (यूएसए) यूएस नॅशनल पार्क अशाच एका निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. तेथील दक्षिण पश्चिमेकडील वाळवटांतील प्रदेशासह उंच पर्वतरागांमध्ये अनेक लोकांना तसेच संस्थांना एक तास योगाचा सराव करण्याची मुभा आहे. अमेरिकन सरकारने खास योगासाठी उपलब्ध करून दिलेल्या पाच नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणांची ही माहिती वाचकांसाठी आणि योगप्रेमींसाठी नक्कीच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरणारी आहे.

Yoga
महाराष्ट्र देशा : जात नाकारणाऱ्यांचं गाव

कुयाहोगा व्हॅली नॅशनल पार्क, ओहिओ (Cuyahoga Valley National Park, Ohio)

ओहिओ हे उन्हाळा आणि हिवाळ्यातील पर्यटनासाठी अमेरिकेतील एक प्रसिद्ध स्थळ आहे. घनदाट जंगलात विविध वनस्पती आणि झाडाझुडुपांच्या सान्निध्यात योगा सराव करण्याचा अवर्णनीय आनंद तुम्ही लुटू शकता. क्लीव्हेलँडच्या दक्षिण पूर्वेला 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या द कुयाहोगा व्हॅली नॅशनल पार्क वसलेले आहे. येथे मिळणारा आनंद केवळ मन:शांती नव्हे तर आरोग्यवर्धक आहे. हिवाळ्यात पार्कमधील वातावरण अधिकच आल्हाददायक बनते. त्यावेळचा योगा सरावाचा आनंद आणखी वेगळा असतो. प्रत्येक पर्यटकासाठी ही आयुष्यभराची आठवण असते.

Awesome Places for Yoga in America
Awesome Places for Yoga in America esakal

जोशुआ ट्री नॅशनल पार्क, कॅलिफोर्निया ( Joshua Tree National Park, California)

दक्षिणेकडील कॅलिफोर्नियाला भेट देतेवेळी जोशुआ ट्री नॅशनल पार्कमधील भव्य-दिव्य वृक्षसंपदा पाहून तुम्हाला योगा करण्याची प्रेरणा आपोआप मिळते. हे ट्री पार्क 321,000 हेक्टरमध्ये विस्तारले आहे. लॉस एंजलिसच्या पूर्वेला २१० किलोमीटर अंतरावर असलेल्या या पार्कमध्ये अनेक स्पाइनी ट्री तुमचे लक्ष वेधून घेतात, मन मोहित करतात. या पार्कमध्ये योगा सराव करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ सॅन दिएगो रिक्रिएशनकडून अनेक सत्रे आयोजित केल्या जातात. तसेच पर्यटकांना अनेक परवडणाऱ्या ऑफर्स दिल्या जातात.

Awesome Places for Yoga in America
Awesome Places for Yoga in America esakal

ग्रँड कॅनयॉन नॅशनल पार्क, अरिझोना ( Grand Canyon National Park, Arizona)

अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटकांसाठी अॅरिझोनातील ग्रँड कॅनयॉन नॅशनल पार्क हे सर्वांत प्रसिद्ध आउटडोअर डेस्टिनेशन (पर्यटनस्थळ) आहे. मात्र, यावेळी तुम्ही येथे भेट द्याल, तेव्हा कायमस्वरूपी हे तुमच्या लक्षात राहील. फोनिक्सच्या उत्तरेला 360 किलोमीटर दूर असलेल्या उत्तरिय (नॉर्दर्न) अरिझोना हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण पश्चिमेतील मूळ अमेरिकन कम्युनिटीचे अनेक धार्मिक कार्यक्रम येथे होतात. या ठिकाणी योगा सराव करताना निसर्गरम्य आणि धार्मिक वातावरण असा दुहेरी आनंद तुम्हाला मिळतो. ग्रँड कॅनयॉन असोसिएशनतर्फे नॅशनल पार्कमध्ये योगा रिट्रिटचे आयोजन केले जाते. ग्रँड कॅनयॉन असोसिएशन हे ग्रँड कॅनयॉन नॅशनल पार्कचे अधिकृत नॉन प्रॉफिट पार्टनर आहेत.

रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो (Rocky Mountain National Park, Colorado)

अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडोमधील सौंदर्य भुरळ पाडते. डेन्वेरच्या उत्तर पश्चिम भागापासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्टेस पार्कमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसह योगा करण्याचा अनोखा आनंद लुटू शकता. डेन्वेर हे अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. पर्वतांच्या रांगांमध्ये योगा करताना आयुष्य रिफ्रेश करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त न करता येणारा आहे. इस्टेस पार्क येथे उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत योगा क्लासचे आयोजन केले जाते. अमेरिकेतील हा अनुभव प्रत्येक पर्यटकासाठी अविस्मरणीय असतो.

Awesome Places for Yoga in America
Awesome Places for Yoga in America esakal

अॅकॅडिया नॅशनल पार्क, मेने (Acadia National Park, Maine)

बँगोरच्या (मेने) दक्षिण पूर्व भागातून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या अॅकॅडिया नॅशनल पार्कमध्ये अत्यंत शांतप्रिय वातावरणात योगासह मेडिटेशन करण्याचा आगळा आनंद अनुभवता येतो. येथील एकाहून अनेक तलाव तसेच त्यासाठी व्यतित केलेला कालावधी तुमचे आरोग्य सुधारण्यात आणि मन मोहून टाकण्यास मदत करतो.

Yoga
स्वभावाला औषध ‘नक्कीच’ आहे...

गो यूएसए (Go USA)

अमेरिकेतील प्रत्येक सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांची पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी गो यूएसएने लक्ष केंद्रित केले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून अन्य आकर्षणे, मजेदार रोड ट्रिप आणि संगीत आणि कलेपासून ते पाककला आणि साहसी अनुभव तुम्हाला या माध्यमातून घेता येतील. यूएसए आणि अमेरिकन प्रवास अनुभवांची अमर्याद विविधता आणि अस्सल, समृद्ध संस्कृतीबद्दल अधिक माहिती संपूर्ण जगाला देणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com