‘नेट’की खबरदारी (कृपादान आवळे)

‘नेट’की खबरदारी (कृपादान आवळे)

इंटरनेटचा वापर आता खूप वाढला आहे. मात्र, त्यामुळं अनेक धोकेही वाढले आहेत. आपली माहिती चोरली जाण्यापासून आर्थिक फसवणुकीपर्यंत अनेक प्रकार होऊ शकतात. त्यासाठी ‘नेट’की आणि नेमकी खबरदारी घेणं आवश्‍यक आहे. सुरक्षिततेबाबत असेच काही सोपे कानमंत्र.


फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲप आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर आजच्या तरुण पिढीसोबत प्रौढ व्यक्तीही अगदी सहजपणे वावरताना दिसतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत लोकांशी ‘कनेक्‍ट’ होता येतं. महत्त्वाचे प्रसंग, काही आठवणी किंवा आपल्या दैनंदिन जीवनात घडत असलेले काही ‘किस्से’ शेअर केले जातात. यासाठी कोणत्याही विशेष अशा साधनांची गरज भासत नाही. इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी असली की झालं! सोशल मीडियाचा वापर करत असताना बऱ्याचदा आपण वैयक्तिक माहितीही अपलोड करत असतो. त्यामध्ये आपले फोटो, वैयक्तिक माहिती (मोबाईल क्रमांक), यांसारखी माहिती कोणत्याही युजर्सला मिळू शकते. मात्र, याचा गैरवापर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंटरनेट किंवा सोशल मीडियावर वावरत असताना आवश्‍यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं काय काळजी घ्यावी जाणून घेऊ.

व्हॉट्‌सॲप : या माध्यमाचा भारतात दबदबा प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. वाढत्या युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्हॉट्‌सॲपनेही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्‌सॲपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी (privacy) हा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये लास्ट सीन (शेवटचा वापर), प्रोफाइल फोटो, स्टेट्‌स आणि ब्लॉक असे पर्याय देण्यात आले आहेत.

* लास्ट सीन/प्रोफाइल फोटो/स्टेटस : यासाठी आपल्याला दोन पर्याय देण्यात आले आहेत. आपण आपला ‘लास्ट सीन’ म्हणजे त्या माध्यमावर आपण शेवटचं केव्हा सक्रिय होतो ती माहिती दिसण्याचा पर्याय ‘हाइड’ करू शकतो. तसंच आपल्या मोबाईलमध्ये संबंधित युजरचा क्रमांक सेव्ह असल्यासच त्याला प्रोफाईल फोटो किंवा स्टेटस पाहता येऊ शकतं. मात्र, यासाठी गरजे आहे ती त्याच्या ॲक्‍टिव्हेशनची. हा पर्यायही त्यामध्येच देण्यात आला आहे.  

* ब्लॉक (Block) : ब्लॉक हा पर्याय व्हॉट्‌सॲपमध्ये देण्यात आला आहे. आपल्याला अनावश्‍यक व्यक्तीकडून मेसेजेस येत असतात, तेव्हा आपण संबंधित युजरला ब्लॉक करून ते मेसेजेस थांबवू शकतो. परिणामी पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

* सिक्‍युरिटी (Security) : या पर्यायामधून end-to-end encryption हा दुसरा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाच्या माध्यमातून फक्त दोन युजर्समधलं संभाषण सुरक्षितपणे होऊ शकते. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला (Third Party) याची माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे याच्या माध्यमातून केलं गेलेलं संभाषण सुरक्षित मानलं जातं. 

कोणत्याही वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरत असताना वेबसाईटच्या यूआरएलमध्ये https असल्याची खात्री करून मगच संबंधित वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरावी. यूआरएलमध्ये नुसतं http असं असल्यास संबंधित वेबसाइटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. त्यामुळं https या यूआरएलनं सुरू होणारी वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित असल्याचं ग्राह्य धरावं. 

इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. खोटी वेबसाइट तयार करून विविध आमिषं दाखवून आपली वैयक्तिक माहिती मागितली जाते. मात्र, हे सर्व करताना खात्री करणं करणं गरजेचं आहे. अशा काही प्रकरांची माहिती घेऊ. 

सायबर स्टॉकिंग ः  सायबर स्टॉकिंगमध्ये आपली वैयक्तिक माहिती चोरली जाते, क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. तसंच ट्‌विटर, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरून आपली वैयक्तिक माहिती चोरून धमकावण्याचे प्रकार होत असतात. याशिवाय विविध आमिषं दाखवून आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळं या सर्वांपासून वाचण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर देऊ नये.  

मालवेअर : मालवेअर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सहजपणे शिरकाव करू शकतात. हा वायरस म्हणजे एक काँप्युटर प्रोग्रॅम असून, तुमच्या काँप्युटरला त्याचा प्रादुर्भाव झाल्यास आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.   

स्पायवेअर ः हादेखील वायरसचा एक भाग आहे. याद्वारे फसवे ई-मेल पाठवले जातात. या ई-मेल्सच्या माध्यमातून युजरला आर्थिक किंवा इतर काही आमिषं दाखवून फसवणूक केली जाते. मात्र, हे करत असताना संबंधित युजरला याबाबतची कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळं प्राप्त झालेल्या ई-मेलला रिप्लाय देताना आवश्‍यक खबरदारी घ्यावी. 

फिशिंग ः यामध्ये बनावट ई-मेल तयार करून त्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा ई-मेल आणि पासवर्ड चोरला जाऊ शकतो. तसंच युजरची वैयक्तिक माहिती किंवा क्रेडिट/डेबिट कार्डची माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळं अशा कोणत्याही मेसेजेस, ई-मेल्सना रिप्लाय देऊ नये. 

वायरलेस थ्रेट्‌स ः  वायरलेस नेटवर्क वापरताना सिक्‍युरिटी ऑप्शनचा वापर करणं सुरक्षेच्या दृष्टीनं गरजेचं आहे. वाय-फायसारख्या साधनांचा वापर करताना पासवर्ड सेट केलेला असावा. तसंच हा पासवर्ड काही ठराविक दिवसांनंतर बदलावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com