

India EU FTA
esakal
डॉ. मानसी फडके- saptrang@esakal.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जगभरातील आयात शुल्क दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर २७ जानेवारी २०२६ ला जाहीर झालेला भारत-युरोपियन संघ (ईयू) सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार विशेष महत्त्वाचा ठरतो. भारताला २७ देशांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवणारा हा करार दबावाखाली नव्हे, तर संवाद आणि वाटाघाटींमधून साकारलेला आहे. संरक्षणवाद वाढत असलेल्या जगात हा करार नियमाधारित, पारदर्शक आणि सहकार्यावर आधारित व्यापार व्यवस्थेचा ठोस पुनरुच्चार करतो.