दगडांच्या देशा : वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

Saptarang
SaptarangEsakal
Updated on

''रस्ते अथवा महामार्ग ही देशाची ओळख असते. मग ते कोणतेही राज्य असो अथवा शहर असो ते किती विकसित आहे, हे त्या ठिकाणच्या रस्त्यावरून लक्षात येते. रस्ते व महामार्ग टिकविणे त्याची काळजी घेणे. शासनाबरोबरच सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे. आपण त्याचा वापर कसा करत आहे. यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. शासन रस्ते तयार करतात व टिकवण्यासाठी प्रयत्नही केले जातात. महामार्गांच्या निर्मितीनंतर असताना दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे वेअर हाऊस उभारले गेले आहे. यामुळे वाहतुकीत प्रचंड अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ मुंबई भिवंडी रस्त्यावर महामार्ग तयार झाल्यानंतर निर्माण झालेल्या वेअर हाऊसमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा आपणास कायमच अनुभवतो. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या वरिष्ठ विभागाने समन्वय साधला पाहिजे. गारगोटी सारखा उद्योग मी निर्माण केला त्यावेळेस बदलाची सुरुवात स्वतःपासून केली. लोक बदलतील शासन निर्णय घेईल हे करण्यापेक्षा आपण आपले निर्णय घ्यावे. प्रथम स्वतःमध्ये बदल करावा आणि तो मी केला अन् त्यात यशस्वीही झालो.'' - के. सी. पांडे.

Saptarang
दगडांच्या देशा : वित्तीय संस्थांनी पर्यटनास प्रोत्साहन द्यावे

सकाळच्या प्रहरी अथवा संध्याकाळी लोक वॉकिंग साठी अथवा सायकलिंग साठी बाहेर पडतात त्यावेळी रस्त्याचा अंदाज घेत नाही. वाहतुकीकडे दुर्लक्ष करून वॉकिंग करीत असतात. त्यावेळी प्रामुख्याने रिफ्लेक्टर असलेले टी-शर्ट रस्त्याच्या कडेने चालले हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे अपघात टाळले जातात. मुंबई ही राज्याची राजधानी तर आहेत परंतु देशाची ही आर्थिक राजधानी आहे. यामुळे या मुंबईत येणारी वाहतुकीचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. ठराविक ठिकाणीच मुंबईकडे जाताना तासंतास वाहतुकीत अडथळा निर्माण होत असतो.

वाहतूक समस्या सुटल्यास होईल आर्थिक विकासही निश्चित

ट्राफिक जाम मुंबईला जाताना हे जणू काही समीकरणच आहे, हे बदललं पाहिजे यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अनेक वेळा बाहेरच्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी दौरे करीत असतात. त्यात तज्ञांचाही समावेश असतो पण यात अधिक सुधारणा आवश्यक आहे. दौरा झाला सूचना मांडल्या इतकेच साध्य यामधून केले जाते. पण त्या अभ्यास दौऱ्याचा फलित काय आहे याचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्या दौऱ्यातून मिळालेल्या काही सूचना प्रत्यक्षात आपल्या इथे राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अलीकडे देशात आश्वासक नेतृत्व बघायला मिळत आहे. पण त्यासाठी नागरिकांनीही पुढे आलं पाहिजे.

महामार्ग तयार होत असताना त्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. दुर्दैवाने हे चित्र सध्या बघावयास मिळत नाही, त्यास प्रचंड विरोध होतो वेळे प्रसंगी हिंसक वातावरण ही निर्माण होते. विकास हा सर्वांसाठीच होणार आहे. महामार्ग झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांनाच मिळणार आहे. महामार्गाबरोबरच रस्ते सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा प्रशासनाने जागरूकता दाखवली पाहिजे. जगातील एकमेव गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय जगभरात सुप्रसिद्ध आहे. देश परदेशातून लोक भेट देण्यासाठी नियमितपणे तेथे येतात. तरीही सिन्नर एमआयडीसीतील रस्त्यांची दुरावस्था ही अत्यंत चिंताजनक आहे. यामध्येही सुधारणा झाली पाहिजे.

Saptarang
दगडांच्या देशा : गारगोटीचे जागतिक महत्त्व ध्यानात घ्या!

वाहतूक समस्या सुटेल त्याचबरोबर आर्थिक विकासही निश्चित होतो. वेळेची बचत इंधन खर्चात कपात,तात्काळ सेवा यामुळे वाढणारा वाहतुकीचा खर्च कमी होऊन त्याचा विनियोग योग्य ठिकाणी होतो.त्यातून रोजगार निर्मितीच्या संधी आहे.

आपण आपल्या हक्कांबद्दल नेहमीच जागरूक असतो. पण कर्तव्याची जेव्हा पाळी येते तेव्हा आपण मागे हटतो,असे चित्र समाजात सगळीकडे बघायलास मिळते. सदर बाब अत्यंत चुकीचे आहे. जो समाज जो देश ज्यामुळे आपल्याला ओळख आहे.तेथील पालक संस्थेने म्हणजेच शासनाने दिलेले नियमावलींचे आपण आपले कर्तव्य समजून पालन केले पाहिजे. गारगोटी सारखा प्रकल्प उभारताना अनेक अडचणींचा सामना झाला. पण कर्तव्य बजवताना विशेष करून समाजाप्रती अथवा शासनाप्रती मी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी कदाचित मला नुकसान सहन करावा लागले. पण माझ्या ध्येयापासून मी हटलो नाही. कर्तव्य पालनचा जेव्हा विषय येतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कायदा व सुव्यवस्था होय. जिल्हा प्रशासन असेल अथवा पोलीस प्रशासन यांनी निर्देशित केलेली नियम हे आपल्या हितासाठी आहे. यामुळे आपलेच प्राण वाचणार आहे. याचे तंतोतंत पालन केले पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशात वाहतुकीचे नियम पाळताना प्रचंड प्रमाणात उदासीनता आहे. सर्वच पातळीवर आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम पालन न करण्यामध्ये सुशिक्षित वर्गाचे प्रमाण अधिक आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. वाहन चालविताना विविध नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.

Saptarang
दगडांच्या देशा : संघर्षाला हवी निश्‍चित दिशा!

अपघात ही आजारापेक्षाही महाभयंकर परिस्थिती

वेगावर नियंत्रण, योग्य दिशेने वाहन चालविणे.आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अथवा इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घरातील एखादा करता कर्ता व्यक्ती आणि विविध उमेदीच्या काळात घरातून हसत खेळत बाहेर पडते कामावर जाण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे स्वतः अथवा इतरांनी केलेल्या चुकीमुळे मोठा अपघात होतो. एका आजारापेक्षाही त्या कुटुंबीयांसाठी ही परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. असे घडू नये म्हणून प्रशासन ठिकठिकाणी बोर्ड, स्पीड बेकर, सिग्नल,झेब्रा पट्टे धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले असतात पण नागरिक त्याच दात देत नाही. लोकसंख्येचे प्रमाण व उपलब्ध असलेली पोलीस प्रशासनाची संख्या यात प्रचंड तफावत आहे. पोलीस प्रशासन प्रत्येकामागे एक कर्मचारी ठेवू शकत नाही. कधी दंडात्मक तर कधी सौम्य अथवा कठोर प्रकारची कारवाई करतातच. पण कारवाई करण्याची गरजच नाही पडली पाहिजे. स्वयंस्फूर्तीने आपण पालन केले पाहिजे. वेगावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्पीड बेकर अथवा दंड करू शकते पण प्रत्येकाच्या वाहनात बसून वेग कमी करू शकत नाही.

Saptarang
दगडांच्या देशा : प्रामाणिक प्रयत्नांची सिद्धता!

हेल्मेट न घातल्यास कारवाई होऊ शकते पण प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट घालू शकत नाही. या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजे.अमेरिकेत सारख्या देशात मी गेल्या अनेक वर्षापासून नियमितपणे गारगोटीसाठी जात आहे तेथे व आपल्या येथील परिस्थितीत फार फरक आहे नियमांचे पालन केले जाते. आपल्याकडे नियमांचे पालन न करणे यात शौर्य समजले जातात. सर्व जर व्यवस्थितपणे अथवा सुरळीतपणे सुरू ठेवायचे असेल तर शासनाबरोबरच लोक सहभागी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी सुद्धा शासनाबरोबर पुढे आले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com