दगडांच्या देशा : संघर्षाला हवी निश्‍चित दिशा!

काही लोक आयुष्यभर संघर्ष करतात; पण निश्चित दिशा नसल्यामुळे मानवी विकासाच्या उत्थानाकरिता योगदान देऊ शकत नाहीत.
K C Pande
K C Pandeesakal

लेखक - के. सी. पांडे

काही लोक आयुष्यभर संघर्ष करतात; पण निश्चित दिशा नसल्यामुळे मानवी विकासाच्या उत्थानाकरिता योगदान देऊ शकत नाहीत. ती माणसे स्वतःचा उत्कर्षही करू शकत नाही. कोणत्याच प्रकारची जबाबदारी पेलू शकत नाही. जगभरातल्या इतिहासाची पाने पलटली असता आपल्या निदर्शनास येईल, की संघर्षातून अनेक माणसे पुढे आली. त्यांच्या संघर्षाला एक निश्चित दिशा होती. ती फिनिक्ससारखी शून्यातून पुढे आली.

गारगोटीची ओळख जगभरात निर्माण करण्यामागे अनेक संघर्षमय प्रवास व आयुष्यातील चढ-उतार यांचा सामना करावा लागला. यात अनेक अनाकलनीय घटना घडल्या. प्रामुख्याने युरोप, अमेरिका व भारतातील बदलते संबंध, अमेरिकेवर झालेला ९/११ चा दहशतवादी हल्ला, अलीकडच्या काळात जगभरात आलेली कोरोनाची महामारी यामुळे व्यवसायात खूप बदल झाले; पण त्यातून मार्गक्रमण करीत गारगोटीची ओळख ही जगभरात दिवसेंदिवस वाढत गेली व तिचे वैभव हे कायम राहिले, हे मात्र निश्चित.

K C Pande
दुनियादारी : लक्ष आहे का?

गारगोटीच्या व्यवसायानिमित्त मी १९९४ पासून नियमितपणे परदेशात प्रामुख्याने युरोप व अमेरिकेत अनेकदा गेलो. गेल्या २८ वर्षांत युरोप व अमेरिकेत अनेक बदल झालेले आपणास बघावयास मिळेल. युरोप आणि अमेरिकेचा भारतीय व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वी नकारात्मक स्वरूपाचा होता. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक कुटुंब हे युरोप व अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांचे व्यवसाय स्थिरस्थावर झाले. त्यामुळे त्यांची तेथील लोकसंख्याही वाढत गेली. त्यांचे खानपान उदाहरणार्थ मांसाहारी हे काही प्रमाणात सारखेच असल्यामुळे, तसेच कुटुंबपद्धती विस्तार यामुळे आजूबाजूच्या देशांमध्येही यांची कुटुंबे विस्तार निर्माण झाली. तसे भारताबाबत उशिरा सुरवात झाली. आपले भारतीय बांधव आपली विचार संस्कृती यामध्ये अधिक राहिले व एकंदर आपली भारतीय मनोवृत्ती ‘आपण आपल्या इथेच, आपल्या भूमीवर स्थायिक राहावे’, अशी असल्याने ते आपले प्रामुख्याने स्वभाववैशिष्ट्ये आहे. अलीकडच्या काळात मात्र ही परिस्थिती बदलली आहे. जगभरात आता भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. पण हे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. पूर्वी असे नव्हते, त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेशातील नागरिकांना युरोप-अमेरिकेमध्ये प्रवास करताना भारतीयांपेक्षा प्राधान्य दिले जायचे. या देशातील नागरिकांचे जर दहा व्हिसा मंजूर झाले, तर त्या प्रमाणात भारतीय नागरिकांचे जास्तीत जास्त दोन ते तीन व्हिसा मंजूर होत.

आत्मघातकी हल्लेखोरांनी ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेची प्रवासी विमाने ताब्यात घेतली आणि ती थेट न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (डब्ल्यूटीओ) दोन गगनचुंबी टॉवरला धडकवली. या दुर्घटनेत हजारो लोकांचा जीव गेला. हा हल्ला म्हणजे केवळ अमेरिकेच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी शतकातील सर्वांत वेदनादायी आणि धक्कादायक अशी घटना ठरली. या घटनेमागे मुस्लिम समाजातील काही दहशतवादी संघटना आहेत, हे सिद्ध झाले आणि त्यानंतर मात्र युरोप व अमेरिका यांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरवात झाली. भारत आणि अमेरिका हे दोन्‍ही देश दहशतवादाला विरोध आणि लोकशाहीला समर्थन देणारे असल्‍याने त्‍यांच्‍यातील मजबूत संबंध निर्माण होणे देशहिताचे असल्‍याचे अमेरिका व युरोपीय देशांच्या लक्षात आले.

K C Pande
सोनेरी स्वप्नं : मी चप्पलचोर!
कॅल्साइट- कॅल्शियम कार्बोनेट
कॅल्साइट- कॅल्शियम कार्बोनेटesakal

फायदे : कॅल्साइटमध्ये ऊर्जा वाढविण्याची आणि शुद्ध करण्याची, तसेच चक्रांना स्पष्ट आणि संतुलित करण्याची क्षमता आहे. हे नकारात्मक ऊर्जा शोषून आणि परिवर्तन देखील करू शकते. कॅल्साइट हे एक स्फटिक आहे, जे मन शांत करते आणि मानसिक स्पष्टता वाढवते आणि ते भावनांना बुद्धीशी जोडते.
परिसर : जळगाव

ह्युलांडाइट
ह्युलांडाइटesakal



रासायनिक रचना : कॅल्शियम सोडियम अॅल्युमिनियम सिलिकेट
फायदे : Heulandite संपूर्ण शारीरिक उपचारांना उत्तेजन देऊ शकते. शरीरात चांगला रक्तप्रवाह देखील वाढवू शकते. त्याची उपचारशक्ती मूत्राशय, मूत्रपिंड आणि यकृत यांना मदत करू शकते. हे आतील कानाच्या समस्यांसह आणि श्वसन प्रणालीला चालना देण्यासाठी देखील मदत करू शकते.
परिसर : जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com