दगडांच्या देशा : वित्तीय संस्थांनी पर्यटनास प्रोत्साहन द्यावे

K C Pandey with Students
K C Pandey with Studentsesakal

लेखक : के. सी. पांडे

पर्यटन हा सध्या जगात सर्वांत वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. जगाच्या पाठीवर अनेक असे देश आहे, की त्यांची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. आपला देश ही पर्यटनाचा वारसा असलेला देश आहे. यात अनेक प्रकारचे पर्यटन उपलब्ध आहे. प्रामुख्याने काही नैसर्गिक आहेत, तर काही मानवनिर्मित वास्तू ही आहेत. याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय दृष्टिकोन अधिक सकारात्मक होणे आवश्यक आहे. विशेषकरून मानवनिर्मित पर्यटन स्थळे आहे. त्यात प्रामुख्याने गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय असेल अथवा इतर काही वास्तू असतील, याबाबत शासनाने निश्चित धोरण ठरविले पाहिजे. विशेषकरून वित्तीय संस्थांनी पर्यटनाबाबत आपले नियम शिथिल करून अधिक उदारमतवादी होण्याची गरज आहे. (saptarang Latest Marathi Articles by KC Pandey on Financial institutions should promote tourism Nashik News)

K C Pandey with Students
आरोग्य सेवा आणि आर्थिक अडचणी
esakal

पर्यटन स्थळांच्या विकासाच्या बाबतीत जर कुणाला आर्थिक मदत हवी असेल, तर त्यासाठी आपले पारंपरिक निकष जे आहेत, त्यात लवचिकता आणली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे. पण त्याचा जेव्हा आम्ही विस्तार करण्याचा विचार करतो, त्याला भव्यदिव्य स्वरूपात शिर्डी येथे स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी वित्तीय संस्था म्हणजेच बँकांकडून त्याचे मूल्यांकन करण्याची पद्धत ही बदलली पाहिजे. गारगोटी ही अनमोल आहे, तिची किंमत होऊच शकत नाही.

निसर्गाच्या गर्भामध्ये हा अनमोल खजिना जेव्हा जगासमोर आला, तेव्हा संपूर्ण जग माझ्याकडे बघून आश्चर्यचकित झाले. संपूर्ण जगात कौतुक झाले; पण आपल्या देशात जेव्हा हा प्रकल्प मी अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्याचा शिर्डी येथे प्रयत्न केला, तेव्हा वित्तीय संस्थेच्या काही जाचक अटींचा मला सामना करावा लागला. बँकांची प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू ठरवण्याची एक निश्चित पॉलिसी आहे. जे घटक अनमोल आहे, त्याला विशेष मानांकन देणे गरजेचे आहे, असे घडल्यास पर्यटनाबरोबरच देशाचाही विकास घडले.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

K C Pandey with Students
मुलांवर अवाजवी लक्ष ठेवल्याचे परिणाम...
esakal

भारतासारख्या विकसनशील देशातही पर्यटन गेल्या काही वर्षांत जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे परकीय चलनामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गसंपन्न प्रदेश, इतिहासाच्या खुणा जपणारे ऐतिहासिक गड-किल्ले, स्थानिक संस्कृती, समृद्ध जंगले, अभयारण्य वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता हे तर आहेच; पण मानवनिर्मित अशा अनेक वास्तू आहे का, त्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी नियमितपणे जात असतात. गारगोटी संग्रहालय यातीलच एक जगातील एकमेव आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे.

पर्यटन क्षेत्रात जागरूकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार प्रसार आला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्न करते; पण त्यास लोकसहभाग आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. नैसर्गिक सौंदर्य संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी यावे म्हणूनच पर्यटन विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. आज आपल्यासमोर सिंगापूरचे उदाहरण आहे. येथे दर वर्षी पर्यटन दिवस वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा होतो. त्यात अनेक महत्त्वाच्या बाबी येतात तसेच सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक, जागतिक शांतता विकास, परस्पर संवाद, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास यांचा तेथे समावेश केला जातो. प्रत्येक राज्यात पर्यटन विकास महामंडळ आहे, पण त्यांची कार्यपद्धती अधिक गतिशील पद्धतीने करणे गरजेचे आहे.

K C Pandey with Students
बेटांचा जीव मुठीत

देशाच्या आर्थिक विकासात आणि रोजगारनिर्मितीत पर्यटन हा महत्त्वाचा घटक आहे. पर्यटन क्षेत्राचे महत्त्व यावरून समजू शकते, की जगातील सुमारे १५० देशांमध्ये परकीय चलन मिळविणाऱ्या पाच प्रमुख क्षेत्रांपैकी पर्यटनदेखील एक आहे. पर्यटन हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे सशक्त माध्यम मानले जाते. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वोच्च सेवा उद्योगांपैकी एक आहे. विशेषत: देशाच्या दुर्गम भागात आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून त्याचे महत्त्व लक्षणीय आहे.

देशातील सुमारे ५० दशलक्ष लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पर्यटन क्षेत्रातील रोजगारामध्ये गुंतलेले आहेत. देशातील कुशल आणि अर्ध-कुशल कामगारांना रोजगार देणारे पर्यटन हे दुसरे प्रमुख क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात काम करणाऱ्या ७० टक्के महिला आहेत. जागतिक स्तरावर, पर्यटन क्षेत्र इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जवळपास दुप्पट महिलांना रोजगार देते. या दृष्टिकोनातून, पर्यटन क्षेत्र हे समाजातील समानता आणि सामाजिक न्यायाचे समर्थन करणारे माध्यम आहे. पर्यटनातून मिळणारे परकीय चलन देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मदत करते. भारताच्या पर्यटन उद्योगाने औषध आणि योग यासारख्या क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी त्याच्या पारंपरिक सीमांच्या पलीकडे विस्तार केला आहे.

पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ठोस धोरणे आणि तपशीलवार योजना राबवण्यात आल्या. त्यामुळे पर्यटन व्यवसायात सातत्याने वाढ झाली, त्यास अधिक अद्ययावत करणे गरजेचे आहे. पर्यटन क्षेत्रासाठी काही आव्हानेही आहेत.
पर्यटन स्थळांची काही दिशादर्शक अथवा दर्शनी भागावर बोर्ड लावलेले असतात, त्या बोर्डवरच दुसऱ्या कुणीतरी आपले प्रचाराचे स्टिकर अथवा फलक चिटकवून देतो. त्यामुळे पर्यटक भरकटतो, त्याला पर्यटन स्थळ समजून शकत नाही, असे अतिक्रमण करण्याची भूमिका आपल्या देशात जास्त आहे.

K C Pandey with Students
माणसं जोडणारी पदयात्रा

देशातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये पसरलेली अस्वच्छता भारताला जगासमोर एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून सादर करण्याच्या मार्गात येते. आजूबाजूला अस्वच्छता असल्याने मोठ्या संख्येने पाश्चात्य देशांतील पर्यटक भारतात येणे पसंत करत नाहीत. पर्यटकांची सुरक्षितता हाही पर्यटनाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटक स्वत:ला जितका सुरक्षित देश समजतो, तितकाच तो भेट देण्याची योजनाही आखतो. देशात आपली प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न करत आहे, पण पूर्णपणे यश आलेली नाही. भारताला आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा ठळकपणे दाखवण्यात जे यश मिळालं आहे, तितकं यश पाश्चिमात्य देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी मिळवलं आहे. कोणत्याही सरकारने आपल्या पर्यटन उद्योगाबाबत दूरगामी धोरणांचे पालन केलेले नाही.

देशातील पर्यटन पायाभूत सुविधादेखील कमकुवत अवस्थेत आहेत, ज्याचा विकास करणे आवश्यक आहे. हवाई, रेल्वे, बस इत्यादी साधनसामग्रीसाठी पुरेशा सुविधाही उपलब्ध असाव्यात. पर्यटन विश्रामस्थळे, हेरिटेज हॉटेल इत्यादी पुरेशा सुविधांमुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटन उद्योगात विपुल जैवविविधता असलेली जंगले, नद्या, पर्वत,ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे, लेणी, संग्रहालये, स्मारके आणि संस्कृती यामुळे उच्च विकास साधण्याची अपार क्षमता आहे. या क्षेत्रातील आव्हाने त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात यशस्वीपणे जतन करणे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवेशयोग्य बनवणे हे आहे. गारगोटीसारख्या आगळावेगळा प्रकल्पाला साहसी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, इको-टुरिझम, ग्रामीण पर्यटन, क्रूझ पर्यटन, बैठका, परिषदा आणि प्रदर्शने यात प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

K C Pandey with Students
चळवळींच्या माहेरघरी साहित्यिकांचा मेळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com