हेल्थ इज वेल्थ : सेवाभावी वृत्ती असलेल्यांसाठी नर्सिंगमध्ये संधी

Dr. Vishal Jadhav
Dr. Vishal Jadhavesakal

लेखक : डॉ. विशाल जाधव

नर्सिंग एक अद्वितीय सेवा आहे. त्यांच्याकडे इतरांची काळजी घेण्याची सर्वांत मोठी शक्ती असते. रुग्णांची काळजी घेणे हे एखाद्या सर्जनच्या मोठ्या ऑपरेशनइतकेच महत्त्वाचे असते. जेव्हा आपण पहिला श्वास घेतो, तेव्हा आणि शेवटचा श्वास घेतो, तेव्हाही सोबत असते ती सिस्टर अर्थात नर्सची. अशा या माणुसकीचा स्पर्श असलेल्या क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. सेवाभावी वृत्ती अंगी असेल तर या क्षेत्राचा विचार करायला हवा.... (sakal special article on Health is Wealth by dr vishal jadhav Opportunities in Nursing for Charitable nashik)

एखादा रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा डॉक्टरपेक्षा अधिक कालावधी रुग्णांसोबत असतात, त्या नर्सेस. त्यामुळे रुग्णांची आणि नर्सेसची भावनिक जवळीक निर्माण होते, डॉक्टरांपेक्षाही भावनिक नाते नर्सेसशी निर्माण झाल्याने सिस्टर या शब्दाचीही रुग्णांना नव्याने ओळख होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

नर्सिंग क्षेत्रात करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात सेवाभावी वृत्ती असणाऱ्या नर्सेसला प्रचंड मागणी आहे.

विशेष म्हणजे भारतीय नर्सेसला परदेशांमधील रुग्णालयांमध्येही मागणी आहे. नर्सिंग क्षेत्रात प्रगती करण्याचा वेग देखील अधिक आहे. ज्यांच्या मध्ये इतरांना मदत करण्यात आनंद वाटतो, त्यांच्यासाठी हा व्यवसाय सर्वोत्तम आहे. 

कोविड-१९ साथीमध्ये आरोग्य व्यवस्थेतील कमतरता ठळकपणे समोर आल्या. त्यावेळी अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे नोंदणीकृत परिचारिका असण्याचे फायदे अधोरेखीत झाले. त्यामुळे आता या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. 

कोणत्याही क्षेत्रात काम करताना आवड, समाजसेवा व मिळणारे आर्थिक लाभ या सगळ्या मुद्यांचा विचार सध्याच्या पिढीकडून केला जातो. या मुद्यांच्या आधारे हे क्षेत्र उत्तम करिअरमध्ये मोडणारे आहे.

 उत्तम दर्जाची सुरक्षा या करिअरमध्ये आहे. लोकसंख्या वाढ आणि महामारीमुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये चांगल्या नर्सेसचा तुटवडा जाणवतो.

त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी आहेत. रुग्णालयांमध्ये पात्र परिचारिकांची आवश्यकता असते. काही अनुभवी परिचारिकांसाठी मोठा साइन-ऑन बोनस देखील सध्या दिला जात आहे. 

Dr. Vishal Jadhav
हेल्थ वेल्थ : औषधी गुणधर्माचे स्वयंपाकघरातील मसाले

परिचारिकांसाठी आजारपणाचा खर्च, पगारी सुट्ट्या, आरोग्य आणि जीवन विमा, कल्याण कार्यक्रम, सशुल्क कौटुंबिक रजा, सेवानिवृत्ती असे एक ना अनेक फायदे उपलब्ध करुन दिले जातात. कामाचे लवचिक वेळापत्रक देखील आखलेले असते. ८ ते १० किंवा १२ तासांच्या शिफ्टचा देखील पर्याय असतो. 

नर्सिंग क्षेत्रात चांगल्या प्रकारचे आर्थिक स्थैर्य देखील मिळते. परिचारिका रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणतात. नर्सला आजारासोबत रुग्णाची भावनिक बाजू आणि त्याचा व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

या कौशल्यांचे संयोजन आणि सहानुभूतीच्या मोठ्या डोसमुळे परिचारिकांना सर्वांत विश्वासार्ह व्यवसाय म्हणून स्थान मिळाले आहे. कोविड महामारीच्या काळात परिचारिका आणि डॉक्टरांना “आरोग्य सेवा नायक” असे संबोधले गेले, ते यामुळेच. 

करिअरमध्ये परिचारिकांना नवी आव्हाने, उच्च पगार आणि नोकरीचे अधिक समाधान देते. भारतीय परिचारिकांना इतर देशांमध्ये मागणी असल्याने त्यांना तो पर्याय देखील खुला असतो.

घाबरलेल्या आणि एकटे असलेल्या रुग्णांना परिचारिका धीर देऊ शकतात. किंवा एखाद्या व्यसनी व्यक्तीशीही प्रसंगी त्या संवाद साधू शकतात. हे केवळ त्यांनाच शक्य होते. 

नर्सिंग क्षेत्रातही आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. उदाहरणार्थ, प्रसुती, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्य आणि डायलिसिसमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची गरज असते.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, औषधांशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला स्वारस्य असेल तर रुग्णांची काळजी घेण्यासाठी परिचारिकांची गरज ही सतत वाढत जाणारी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Vishal Jadhav
Dental Health Tips: हेल्थ इज वेल्थ : दातांचे सौंदर्य जपणे हे उत्तमच!

सर्व परिचारिकांना सुरुवातीला मूलभूत प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. नर्सिंग अभ्यासक्रमात रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये शिकवली जातात. पदवीनंतर रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जे परिचारिकांना त्या क्षेत्रात सराव करण्यासाठी कौशल्ये आणि ज्ञान मिळविण्यात मदत करतात.

साथीच्या आजारांमुळे आणि एकूणच नर्सिंगच्या कमतरतेमुळे त्यांना दिले जाणारे वेतन वाढले आहे. ट्रॅव्हल नर्सेस ही संकल्पना सध्या विकसित होत आहे. ज्यात दर एक तासानुसार ठराविक पैसे दिले जातात. 

ट्रॅव्हल नर्सला पर्यटकांसारखे जग पाहण्याची संधी उपलब्ध होते. ट्रॅव्हल नर्सेस अनेकदा कित्येक आठवडे प्रवाशांबरोबर राहत असल्याने त्यांनाही पर्यटन क्षेत्रांना भेटीची संधी मिळते. 

सुधारात्मक परिचारिका म्हणजे तुरुंगांमध्ये कैद्यांची काळजी घेण्यासाठी नर्सिंगचे क्षेत्र निवडणे शक्य आहे. होम हेल्थ नर्सेस म्हणजे घरात वृद्धांची काळजी घेणाऱ्या नर्सेस. घरात सुरक्षिततेची हमी देणाऱ्या होमकेअर नर्सेसची गरज वाढत आहे.

इतर पर्यायांमध्ये नर्सिंग एज्युकेटर, होलिस्टिक नर्स कन्सल्टंट, क्लिनिकल नर्स रिसर्चर, क्रूझ शिप नर्सेस, पब्लिक हेल्थ नर्सिंग अशा एकाहून एक अद्वितीय सेवा उपलब्ध आहेत.

(लेखक हे 'फेलो इन ओरल इनप्लांट' असून शासकीय रुग्णालयात दंतरोग तज्ज्ञ आहेत)

Dr. Vishal Jadhav
हेल्थ इज वेल्थ : हेल्मेट वापरा, सुंदर चेहरा-जबडा वाचवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com